दिवाळीच्या सुटीत गावी गेलेल्यांची सहा घरे फोडली

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

हडपसर : दिवाळी सणानिमित्त सुटीसाठी गावी गेल्याने बंद असलेल्या तीन सोसायट्यांतील सहा सदनिकांची घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरटयांनी सोन्या-चांदीच्या दागिन्यासंह रोख रक्कम लंपास केली आहे. तीन बंद सदनिकेमध्ये घरफोडी करण्याचा प्रयत्न केला असता चोरटयांच्या हाती काहीही लागले नाही. घरफोडी झालेल्या तिन्ही सोसायट्यांमध्ये सुरक्षारक्षक व सीसीटीव्ही यंत्रणा नव्हती. सर्व घरफोडया रात्रीच्या वेळी झाल्या असल्याचा पोलिसांचा संशय आहे. या प्रकरणी अज्ञात चोरटयां विरूद्ध पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल झाल्या आहेत. 

फिर्यादी भारत लक्ष्मण शेळके (वय ७१ फ्लॅट न. १, पंकज प्लाझा सोसायटी, गोंधळेनगर, हडपसर) हे १८ ऑक्टोंबर रोजी सकाळी सहकुटूंब गावी गेले होते. सेफ्टी डोअर तोडून आतील लॉक कटावनीच्या सहाय्याने तोडून चोरटयांनी घरात प्रवेश केला. कपाटातील सोन्या चांदीच्या वस्तू व रोख रक्कम अशा ६१ हजार रुपयांचे ऐवज चोरट्याने लंपास केले. गावावरून २२ अक्टोंबरला घरी आल्यावर घरातील वस्तू अस्ताव्यस्त पडल्या होत्या. घरातील सोन्या चांदीचे कपाटात नसल्याने शेळके यांनी पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. 

दुसरी घरफोडी हि माजी सैनिक संतोष अप्पासाहेब मगर (  वय ३५, फ्लॅट न. ३०१ बी, शिवपार्क सोसायटी, फुरसुंगी ) यांच्या घरी झाली. ते २० ऑक्टोबरला दिवाळी सणासाठी गावी गेले होते. सदनिकेच्या दरवाज्याचे कुलूप तोडून चोरटयांनी सोन्याचे मंगळसूत्र व लहान मुलांची चैन असे एकूण ५२ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ते २२ तारखेला गावावरून घरी आल्यावर फ्लॅटची चोरी झाल्याचे समोर आले. याच इमारतीमधील अन्य तीन बंद सदनिका चोरट्यानी फोडल्या. यात यादव शेळके यांच्या फ्लॅट मधील तीन हजार रुपये, आधार कार्ड, मतदान कार्ड, पॅन कार्ड चोरीला गेले. तसेच संजीव मोहिते व सीताराम कोदार यांच्या सदनिकेचा दरवाजा उचकटून चोरट्यांनी घरफोडीचा प्रयत्न केला. मात्र चोरट्याच्या हाती काहीही लागले नाही. याबाबत संतोष मगर यांनी तक्रार दिली आहे. 

तिसरी घरफोडी किरण दिपक लूकडे (वय २३ रा. दुर्गा हाईट्स, वैभव सिनेमा मागे, हडपसर) यांच्या घरी झाली. दिवाळी सणासाठी सहकुटुंब ते गावाला गेले होते. यत्यांच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी-कोयंडा उचकटून चोरटयांनी कपाटातील सोने-चांदीचे दागिने व दोन हजार रोख रक्कम असे ७१ हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी लंपास केला. तिन्ही सोसायटीमध्ये सुरक्षा रक्षक नव्हता तसेच सीसी टीव्ही यंत्रणा नव्हती. पुढील तपास हडपसर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक सतीश उमरे व किरण लोंढे करीत आहेत. 

'ई सकाळ'वरील इतर महत्त्वाच्या बातम्या : 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com