Crime : पुण्यात कोयत्यानंतर तलवार- कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार; १४ जण अटकेत | Pune Crime: sword-axes Seal, 14 people arrested | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Crime : पुण्यात कोयत्यानंतर तलवार- कुऱ्हाड घेऊन दहशत माजवण्याचे प्रकार; १४ जण अटकेत

पुणे - पुण्यात कोयते, कुऱ्हाड अन् पालघनसह दहशत माजवणाऱ्या १४ जणांना पोलिसांनी केली अटक केली आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरात दहशत माजवणाऱ्या सचिन माने टोळीच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या आहेत टोळी प्रमुख सचिन माने मैत्रिणीला भेटण्यासाठी आला होता. त्याचवेळी पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

घोरपडी पेठेत पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास फिल्मी स्टाईलने त्याला अटक करण्यात आली. स्वारगेट, सहकारनगर आणि मार्केटयार्ड परिसरात माने टोळीची दहशत आहे. या टोळीवर खून, खुनाचा प्रयत्न, जबरी चोऱ्या, खंडणी यासारखे १४ गंभीर गुन्हे दाखल आहेत.

आरोपींच्या ताब्यातून कोयते, कुऱ्हाड, पालघन यासारखी घातक शस्त्र हस्तगत करण्यात आली आहेत. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या दिवशी स्वारगेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत या टोळीने दुसऱ्या टोळीवर कोयता आणि कुऱ्हाडीने हल्ला केला होता. त्या दिवशीपासून या घटनेतील आरोपी फरार होते. अखेर आरोपींना पकडण्यात पोलिसांना यश आले आहे

टॅग्स :Pune Newscrime