Pune Crime : ट्विटरवरून महिलेला अश्लील कमेंट करणाऱ्यास अटक pune crime twitter women obscene comments arrested | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

Pune Crime : ट्विटरवरून महिलेला अश्लील कमेंट करणाऱ्यास अटक

पुणे - एका महिलेला व्टिटर अंकाउंटवरून अश्लील व्टिट करून बदनामी केल्याप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी मुंबईतून एका तरुणाच्या मुसक्या आवळल्या. या तरुणाविरुद्ध पुणे सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कुणाल भागवत रायसिंग (वय ३९, सध्या रा. गोखले रस्ता, दादर पश्चिम, मुंबई) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण पुण्यातील एका महिलेला १९ फेब्रुवारीपासून वेगवेगळ्या व्टिटर अंकाउंटवरून आक्षेपार्ह आणि अश्लील मजकूर व्टिट करुन बदनामी करीत होता. याबाबत सायबर पोलिसांनी ट्विटर कंपनीशी पत्रव्यवहार केला. तसेच, इतर तांत्रिक बाबींचा तपास करुन आरोपीला अटक केली.

पोलिस आयुक्त रितेश कुमार, सह पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त (गुन्हे) रामनाथ पोकळे, पोलिस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, सहायक आयुक्त विजयकुमार पळसुले, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मीनल सुपे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, उपनिरीक्षक सचिन जाधव, पोलिस अंमलदार प्रवीणसिंह राजपूत, वैभव माने, बाबासो कराळे, शिरीष गावडे, पूजा मांदळे यांच्या पथकाने ही कारवाई केली.