Sun, Sept 24, 2023

Pune Crime : 'तुझ्या मुलाला जीवे मारून टाकेल व बदनामी करेल' असे बोलून विधवेवर वारंवार बलात्कार; सामाजिक कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल
Published on : 24 May 2023, 2:04 pm
धायरी - प्रल्हाद रामदास तांदळे (वय- ३७, कवडे हॉस्पीटल समोर उत्तमनगर) याच्यावर बलात्काराच्या आरोपाखाली सिंहगड रोड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तांदळे हा रचनात्मक सेवा संस्थेचा अध्यक्ष आहे. त्याच्या विरोधात ३७ वर्षीय महिलेने फिर्याद केली आहे.
ती विधवा असून सामाजिक कार्यकत्याशी संपर्क येत असताना आरोपीच्या संपर्कात आली. प्रेम असल्याचे सांगून लग्न करणार असे सांगून गेल्या वर्षी एप्रिल पासून त्याने वेगवेगळ्या ठिकाणी लाॅजवर नेऊन बलात्कार केला. तिच्या घरी राहण्यास येऊन धमकी देऊन अनेकदा बलात्कार करत असल्याने पीडितेने पोलिसांना सांगितले.
'तुझ्या मुलाला जीवे मारून टाकेल व बदनामी करेल' असे बोलून विधवेवर वारंवार बलात्कार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी तांदळे याला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे.