
Pune Crime : बाईकवर स्टंट करत तरुण बनवत होते रिल्स; रस्त्याने चाललेल्या महिलेला दिली धडक अन्...
पुणे - सोशल मीडियावर रिल्स बनवण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढलं आहे. यातून तरुणाई पैसे देखील कमवत आहेत. त्यामुळे अनेकजण भेटेल तिथे रिल्स बनविण्याचं काम करते. मात्र यातून आता अपघाताच्या घटना समोर येत आहे. पुण्यात अशीच एक घटना घडली असून रिल्स बनविणाऱ्या दोन तरुणांमुळे रस्त्याने चाललेल्या महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.
महिला भररस्त्यावर रिल्स बनवत असताना मोटारसायकलने बाजूने चालेल्या दुचाकीला धडक दिल्यानंतर अपघातात महिलेचा मृत्यु झाला. पुण्यातील महमदवाडी या ठिकाणी ही घटना मंगळवारी संध्याकाळी ५.३० वाजता घडली. तस्लिमा पठाण (३१) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे.
याप्रकरणी वानवडी पोलीस ठाण्यात २ तरुणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आयान शेख आणि झायद शेख या २ तरुणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्यांना अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आयान आणि झायद हे दोघे ही जण बाईकवर स्टंट करत सोशल मीडियावर अपलोड करण्यासाठी रिल्स बनवत होते. यावेळी तस्लिमा पठाण या रस्त्यावर दुचाकीवरुन घरी जात होत्या. यावेळी आयान शेख हा बाईक चालवत रिल्स बनवण्यासाठी स्टंट करत होता तर दुसऱ्या बाजूला झायद हा व्हिडिओ काढत होता. दरम्यान, यावेळी आयानने तस्लिमा पठाण यांच्या दुचाकीला धडक दिली.
या धकडकेत पठाण या खाली पडल्या आणि त्यांचा मृत्यु झाला. हा प्रकार घडताच त्या दोघांनी ही तिथून पळ काढला. पोलिसांनी तपास सुरू केल्यानंतर सोशल मिडियावर रिल्स बनवण्यासाठी हे दोघे ही तिथे आले असता ही घटना घडली असल्याने त्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.