पुण्याला सध्या दररोज 1350 एमएलडी पाणी : जलसंपदामंत्री

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 18 जानेवारी 2019

पुणे : पुण्याला सध्या दररोज 1350 दशलक्ष लिटर (एमएलडी) पाणी देण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे. या संदर्भात जलसंपदा विभाग आणि महापालिका अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक मंगळवारी मुंबईत होईल. या बैठकीत पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल, अशी माहिती जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिली.

पुणे महापालिकेला खडकवासला प्रकल्पाच्या जलाशयातून दररोज 1350 एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. परंतु जलसंपदा विभागाने बुधवारी दोन विद्युत पंप बंद केले होते. त्यामुळे सुमारे 250 एमएलडी पाणीकपात होणार होती. या
निर्णयामुळे नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया व्यक्‍त करण्यात येत
होत्या. या संदर्भात महापालिकेत गुरुवारी महापौर, आयुक्‍त आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये बैठक झाली. त्यात मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक घेऊन पाणी प्रश्‍नावर तोडगा काढण्यावर एकमत झाले होते.

दरम्यान, जलसंपदामंत्री महाजन हे "खेलो इंडिया' युथ गेम्ससाठी बालेवाडी येथे शुक्रवारी आले होते. यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, जलसंपदा विभागाकडून पुण्याला सध्या 1350 एमएलडी पाणी देण्याच्या सूचना
दिलेल्या आहेत. खडकवासला प्रकल्पातील शिल्लक पाणीसाठ्याबाबत माहिती घेतलेली आहे. पुणे शहरासाठी पिण्याचे पाणी आणि उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याचे आवर्तन या बाबी लक्षात घेऊन पाण्याचे योग्य नियोजन करावे लागणार
आहे. त्यासाठी जलसंपदा आणि महापालिका अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात उन्हाळ्यातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल.

Web Title: Pune Currently has 1350 MLD of water says Water Resources Minister