Pune Dam Water Level : खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस; चार धरणात मिळून २७.५६ टीएमसी म्हणजे ९४.५५ टक्के पाणीसाठा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Dam Water Level

Pune Dam Water Level : खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस; चार धरणात मिळून २७.५६ टीएमसी म्हणजे ९४.५५ टक्के पाणीसाठा

खडकवासला : शुक्रवारी रात्री दहा वाजेपर्यंत पानशेत येथे तीन, वरसगाव येथे तीन, टेमघरला ११ तर खडकवासला येथे २५ मिलीमीटर पाऊस झाला. दरम्यान, शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळीतील खडकवासला, पानशेत, वरसगाव व टेमघर या चार ही धरणात मिळून २७.५६ टीएमसी म्हणजे ९४.५५ टक्के पाणीसाठा आहे.

खडकवासला धरणात १.२८ टीएमसी म्हणजे ६५.७२ टक्के पाणीसाठा आहे. टेमघर मध्ये २.८२ टीएमसी म्हणजे ७५.९७ टक्के पाणीसाठा झाला आहे. पानशेत, वरसगाव, पवना, भामाआसखेड धरण १०० टक्के भरले आहे.

चार ही धरणातून विसर्ग सुरु

पानशेत मधून एक हजार २८३ क्युसेक, वरसगाव मधून एकूण एक हजार १९७ क्युसेक व टेमघर मधून ३५० क्युसेक पाणी सोडले आहे. या तिन्ही धरणातून सोडलेले दोन हजार ८२० क्युसेक पाणी खडकवासला धरणात जमा आहे. तर खडकवासला धरणातून शेतीसाठी १००५ क्युसेक पाणी सोडले जात आहे.