Pune : 'त्यामुळे' दौंड शहरप्रमुखासह वीस जणांविरूध्द गुन्हा दाखल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Pune

Pune : 'त्यामुळे' दौंड शहरप्रमुखासह वीस जणांविरूध्द गुन्हा दाखल

दौंड - दौंड शहरात सहा महिन्यांपूर्वी जीवे मारण्याचा प्रयत्न करणे व विनयभंग केल्याप्रकरणी शिवसेना (शिंदे गट) शहरप्रमुखासह एकूण २० जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशाने हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शहरातील कुंभार गल्लीत २० ऑक्टोबर २०२२ रोजी एका तरूणीचा विनयभंग केल्याप्रकरणी जाब विचारणार्या महिला व तरूणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला होता. सदर प्रकरणात दौंड नगरपालिकेचा माजी नगराध्यक्ष व राष्ट्रवादी कॅंाग्रेस पक्षाचा माजी गटनेता बादशहा शेख याच्यासह एकूण वीस जणांविरूध्द २१ दिवसांच्या विलंबानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

फरार बादशहा शेख याला अजमेर (राजस्थान) येथून २९ नोव्हेंबर रोजी ताब्यात घेण्यात आले. बादशहा शेख याला ताब्यात घेतल्यानंतर बादशहा शेख याच्या कुटुंबीयांवर देखील २० ऑक्टोबर रोजी पीडितेच्या कुटुंबीयांनी हल्ला केल्याचा दावा करण्यात आला. सदर हल्ला करणार्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी २९ नोव्हेंबर २०२२ रोजी दौंड पोलिस ठाण्यावर शेख समर्थक महिलांनी मोर्चा काढला होता.

दरम्यान या प्रकरणी शहरातील एका महिलेने तिच्यासह तिचे पती आणि कुटुंबीयांवर देखील सशस्त्र हल्ला झाल्याचा दावा करीत त्या बाबत दौंड पोलिस व पोलिस उप अधीक्षक फिर्यादीची दखल घेत नसल्याचा दावा करीत न्यायालयात अर्ज केला. न्यायालयाच्या आदेशाने शिवसेनेचा शहरप्रमुख श्रीनाथ ननवरे याच्यासह अक्षय गोरख घोलप, कुणाल गोरख घोलप, बाबू विजय जमदाडे, अजय घोणे, महेश घोणे, गोरख मच्छिंद्र घोलप,

सागर माढेकर, दिपक कांबळे, कोमल जमदाडे (सर्व रा. दौंड) व इतर दहा अनोळखी लोकांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० ऑक्टोबर २०२२ रोजी अक्षय घोलप याने विनयभंग करून अन्य संशयित आरोपींनी फिर्यादी महिला, तिचा पती आणि कुटुंबीयांना तलवार, लोखंडी सळई, आदींनी मारहाण करून जखमी केले होते, असे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.