दुपारची पुणे-दौंड डेमू 25 जूनपर्यंत बंद

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

पुणे - रेल्वे ट्रॅकवरील दुरुस्तीच्या कामासाठी पुणे-दौंड या मार्गावर दुपारच्या वेळेत सोडण्यात येणारी डेमू गाडी येत्या 25 जूनपर्यंत रद्द करण्यात आली आहे, असे रेल्वे प्रशासनाकडून पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

पुणे रेल्वे स्टेशनवरून दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी दौंडकडे रवाना होणारी गाडी रद्द करण्यात आली आहे, तर दौंडवरून पुण्याकडे पाच वाजून 10 मिनिटांनी येणारी गाडीदेखील रद्द करण्यात आली आहे.

Web Title: pune daund demu close