दौंड : प्रेमविवाह करणाऱ्या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी चौघांविरूध्द गुन्हा

या विवाहितेने ११ डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली.
तरुणीची आत्महत्या
तरुणीची आत्महत्याesakal

दौंड : गिरीम (ता. दौंड) येथील प्रेमविवाह करणार्या तरूणीच्या आत्महत्येप्रकरणी पतीसह एकूण चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दौंड पोलिसांनी या बाबत माहिती दिली. पूर्वा जीवन कोळपे (वय १९, रा. मदने वस्ती, गिरीम, ता. दौंड ) या विवाहितेने ११ डिसेंबर रोजी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. सन २०१९ मध्ये जीवन कोळपे याने तिला पळवून नेल्याप्रकरणी फिर्यादीनुसार त्याच्याविरूध्द लैंगिक अपराधांपासून बालकांचे संरक्षण करणार्या कायद्यातील (पोक्सो कायदा ) कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान पूर्वा सज्ञान झाल्यानंतर पाच महिन्यापूर्वी पूर्वा फुलारी व जीवन कोळपे यांनी प्रेमविवाह केला होता. परंतु ११ डिसेंबर रोजी पूर्वा हिने मदने वस्ती येथे आत्महत्या केली.

तरुणीची आत्महत्या
मुंबई : पालिकेची आरोग्य व्यवस्था मोबाईलवर ?

या प्रकरणी पूर्वा हिचे वडील विश्वनाथ दादा फुलारी (रा. जाधववाडी, गिरीम) यांनी दौंड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पूर्वा हिचा मानसिक व शारीरिक छळ करून करण्याबरोबर दोन वर्षापूर्वी दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी वडिलांना सांगण्यासाठी दबाव टाकत आत्महत्येस प्रवृत्त करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. फिर्यादीनुसार मृत पूर्वा हिचा पती जीवन माणिक कोळपे (वय २५) , सासरा माणिक उर्फ जयसिंग राजाराम कोळपे, सासू लता माणिक कोळपे, दीर मनोज माणिक कोळपे (सर्व रा. मदने वस्ती, गिरीम, ता. दौंड) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला.

फिर्यादीनुसार भारतीय दंड विधान कलम ३०६ (आत्महत्येस चिथावणी देणे) , ४९८ - अ ( स्त्रीला क्रूर वागणूक देणे), ३२३ (इच्छापूर्वक दुखापत पोचविणे), ५०६ (फौजदारीपात्र धाकदपटशा करणे) व ३४ (समान उद्देश साध्य करण्याकरिता दोन किंवा अधिक व्यक्तींनी गुन्हेगारी कृती करणे) अन्वये चौघांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी या प्रकरणी पती जीवन कोळपे, सासरा माणिक कोळपे आणि सासू लता कोळपे यांना अटक केली आहे, अशी माहिती तपास अधिकारी तथा फौजदार भगवान पालवे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com