पुणे : भाजप युवा मोर्चाच्या कार्याध्यक्षांवर घरासमोरच प्राणघातक हल्ला

Pune: Deadly attack on BJP Yuva Morcha working president
Pune: Deadly attack on BJP Yuva Morcha working president

बेबडओहोळ (पुणे) : अज्ञातांनी केलेल्या केलेल्या प्राणघातक हल्ल्यातून पुणे जिल्हा युवा मोर्चाचे कार्याध्यक्ष व मावळ तालुका भाजप युवा मोर्चाचे माजी तालुकाध्यक्ष बाळासाहेब घोटकुले हे थोडक्यात बचावले. हि घटना त्यांच्या राहत्या घरासमोर आढले बुद्रुक येथे शनिवार (ता. ४) रोजी सव्वानऊच्या सुमारास घडली. या संदर्भात बाळासाहेब घोटकुले यांनी शिरगाव पोलीस चौकी येथे रात्री उशिरा फिर्याद दाखल केली. 

शिरगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घोटकुले हे आपल्या घराजवळ रात्री ९.१५ च्या सुमारास शतपावली करत असताना पाच चारचाकी मधून आलेल्या ८-९ जणांच्या टोळक्यांनी त्यांना घेरले व डोक्याला रिव्हाल्वर लावून गळ्यातील चार तोळ्यांची चैन व तीन तोळ्यांचे ब्रास्लेट जबरदस्तीने काढून घेतले. वेळीच आरडाओरड केल्ताने यावेळी मदतीसाठी आलेले बंधू भाऊसाहेब घोटकुले यांना झटापटीत ओठाला किरकोळ मार लागून जखमी झाले. यानंतर हल्लेखोर गाडीमध्ये बसुन पसार झाले. 
-------------
चीनवर आता नवं संकट; तब्बल १०६ जणांचा मृत्यू
------------  
उत्तरप्रदेश, बिहारमध्ये एकाच दिवसात वीज कोसळून तब्बल ४३ जणांचा मृत्यू
------------
या हल्ल्यातील आरोपींचा शोध शिरगाव पोलीस करत असून हल्लेखोरांना लवकरच ताब्यात घेतले जाईल असे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे यांनी सांगितले. यासंदर्भात घोटकुले यांना विचारले असता हल्लेखोर मारण्याच्या उद्देशाने आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com