Pune : डेक्कन येथील प्रसिद्ध चैम्पियन स्पोर्ट्स स्टोअर दुकानाला आग | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

pune

Pune : डेक्कन येथील प्रसिद्ध चैम्पियन स्पोर्ट्स स्टोअर दुकानाला आग

पुणे : डेक्कन जिमखाना येथील प्रसिद्ध असलेल्या चैम्पियन स्पोर्ट्स स्टोअर या दुकानाला सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता आग लागली. या घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आग विझविली. या घटनेत दुकानाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील नामदार गोपाळ कृष्ण गोखले चौकाजवळ चैम्पियन स्पोर्ट्स स्टोअर नावाचे दुकान आहे. या दुकानामध्ये खेळाच्या साहित्यासह विविध प्रकारच्या वस्तू विक्रीसाठी उपलब्ध असतात. दरम्यान, सोमवारी सकाळी साडे नऊ वाजता दुकानाला आग लागली. याबाबत तत्काळ अग्निशामक दलाच्या नियंत्रण केंद्राला माहिती देण्यात आली. त्यानंतर घटनेची माहिती मिळताच दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी काही वेळातच आग विझविली. यावेळी अग्निशामक दलाची 5 वाहने घटनास्थळी दाखल झाली होती.

आग आटोक्यात आणण्यात आली असून आता जवानांकडून कुलिंग करण्याचे काम सुरू आहे. या घटनेत कोणीही जखमी नाही. मात्र दुकानाचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले आहे.

टॅग्स :Pune Newspune