esakal | Pune : विद्यापीठात रंगल्या लोकशाही गप्पा
sakal

बोलून बातमी शोधा

pune university

Pune : विद्यापीठात रंगल्या लोकशाही गप्पा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : अन्य देशांच्या तुलनेत भारतातील लोकशाही, त्याच्या मर्यादा, राजकारण, राजकारणात महिलांचे स्थान, मतदानात ‘नोटा’चा अधिकार, अशा सर्व विषयांवर दिलखुलासपणे चर्चा ‘लोकशाही गप्पा’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून करण्यात आली.

मतदारांमध्ये निवडणूक आणि लोकशाहीविषयी जागृती निर्माण करण्यासाठी प्रक्रिया अधिक सक्षम करण्यासाठी निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र आणि सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्यावतीने विद्यापीठात लोकशाही गप्पांचे आयोजन केले होते. मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सुहास पळशीकर, अभिनेते, दिग्दर्शक नागराज मंजुळे, श्रीरंग गोडबोले, प्रवीण महाजन, रवींद्र धनक, राही श्रुती गणेश आदी मान्यवरांसोबत या वेळी विद्यार्थ्यांनी चर्चा केली. सूत्रसंचालन डॉ. दीपक पवार यांनी केले.

हेही वाचा: श्रावणी सोमवारच्या निमित्ताने भीमाशंकर मंदिरात फुलांची आकर्षक सजावट

डॉ. पळशीकर म्हणाले, ‘‘आपण लोकशाहीची केवळ रचना नाही, तर त्याचा आशयही टिकवणे गरजेचे आहे.’’

रवींद्र धनक म्हणाले, ‘‘स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाली, तरीही आपण प्रजा मानसिकतेतून नागरिक मानसिकतेत आलो आहोत का हा प्रश्न स्वतःला विचारणे गरजेचे आहे.’’

गोडबोले म्हणाले, ‘‘आपली आत्मकेंद्री राहण्याची वृत्ती की लोकशाहीला मारक ठरते आहे, याचा सर्वांनी विचार करायला हवा.’’

मंजुळे म्हणाले, ‘‘आपल्याकडे लोकशाही नावाचं वाहन कसं चालवायचं याचं प्रशिक्षण न देताच ते चालवायला सुरुवात केली आहे, असे मला वाटते. लोकशाही काय आहे हे आधी समजून घेणे गरजेचे आहे.’’ या वेळी अन्य मान्यवरांनीही आपले विचार मांडले.

हेही वाचा: Katraj : रुतलेल्या चाकांना गणेशोत्सवामुळे दिलासा

विद्यार्थ्यांनी मान्यवरांना आपल्या मनातील शंका विचारत त्याचे निरसन करून घेतले. उपस्थितांमध्ये हजेरी लावत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर हे देखील या वेळी गप्पांचा सहभाग झाले.

प्रत्येक महाविद्यालयात स्थापन केल्या जाणाऱ्या निवडणूक साक्षरता मंडळाला लोकशाही मंचाचे स्वरूप येऊन त्यातून जनतेचे सक्षम व्यासपीठ उभे राहावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.

-श्रीकांत देशपांडे, मुख्य निवडणूक अधिकारी

loading image
go to top