Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

devendar fadnavis and uddhav thackeray

उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेत्यांना हे कळून चुकले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे.

Devendra Fadnavis : महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे

पुणे - कोण कुठे बसायचं कोण बोलायचं यावरून वज्रमुठ सभेला यापूर्वीच तडे गेलेले आहेत. उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे नेत्यांना हे कळून चुकले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेलेला आहे. फक्त ते त्यांच्या कार्यकर्त्यांना संदेश देण्यासाठी काही तरी बोलावे आहेत. अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका केली.

बालेवाडी येथे पुणे महापालिकेच्या विविध विकास कामांचे उद्घाटन व भूमिपूजन झाल्यानंतर फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

महापालिकेच्या निवडणुका ऑक्टोबर मध्ये होतील असे फडणवीस भाजपच्या कार्यक्रमात बोलले, त्यावर ते म्हणाले,' महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात जुलै महिन्यामध्ये सुनावणी होऊन ऑगस्टमध्ये निकाल येऊ शकतो. त्यामुळे साधारणपणेऑक्टोबर मध्ये निवडणूक होतील असा अंदाज मी व्यक्त केलेला आहे. यापेक्षा वेगळे काही नाही.

अजित पवारांनी लोकसभा विधानसभेच्या निवडणुका आणि १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत केलेल्या दाव्याबाबत विचारले असता त्यावर फडणवीस म्हणाले, लोकसभेच्या निवडणुका या लोकसभेच्या वेळीच होतील, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. लोकसभेच्या निवडणुका मोदींचे नेतृत्वाखाली आम्ही प्रचंड मतांनी निवडून येऊ त्यानंतर अधिकच काम करून आम्ही विधानसभेमध्ये निवडणुका जिंकू.

वज्रमुठीला आधीच तडे गेलेले आहेत. कोणी कुठे बसायचे? कुठे उभे राहायचे? कोणी बोलायचे यावरून वाद आहेत. त्यांच्या नेत्यांच्या बद्दल शरद पवार साहेबांनी त्यांच्या पुस्तकांमध्ये लिहिलेला आहे. त्यामुळे आम्ही विरोधक आहोत त्याबद्दल बोलण्याची गरज नाही.

16 आमदारांच्या अपात्रतेबाबत मी काहीच बोलू शकत नाही. हे संपूर्ण प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे आहे. त्यांच्याकडे त्याची सुनावणी होणार आहे. जो काही निर्णय द्यायचा आहे तो निर्णय विधानसभा देतील. मात्र, एक अभ्यासक म्हणून, एक वकील म्हणून आणि २५ वर्ष विधानसभेत काम केले म्हणून मी मला असे वाटते की आता उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीला पुरत समजले आहे की महाविकास आघाडीचा पोपट मेला आहे. पण आपल्या कार्यकर्त्यांना काही तरी संदेश देण्यासाठी पोपट जिवंत आहे हे दाखविले जात आहे, असे फडणवीस म्हणाले.

बारामती लोकसभा मतदारसंघावर पत्रकारांचा जास्त लक्ष आहे. आम्ही सर्व ४८ लोकसभा मतदारसंघावर लक्ष देत आहोत. तेथे केंद्रीय नेत्यांचे सातत्याने दौरे होत आहेत. बारामती त्यापेक्षा काही वेगळे नाही जिल्हा विभागणीच्या अनेक मागणी आमच्यापुढे आहेत. त्यामुळे एखाद्या जिल्ह्याचा विचार करता येणार नाही. सर्व जिल्ह्यांचा एकच विचार करावा लागेल,असेही फडणवीस यांनी सांगितले.