पुणे जिल्ह्यात आतापर्यंत पावणेदोन लाख रुग्ण कोरोनामुक्त, तरीही चिंता आहेच

In Pune district 2 lakh 75 thousand patients have been corona free so far
In Pune district 2 lakh 75 thousand patients have been corona free so far

पुणे : पुणे जिल्ह्यातील पावणे दोन लाख रुग्ण आज अखेरपर्यंत (ता.१२) कोरोनामुक्त झाले आहेत. मात्र रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले असले तरी दररोज नव्याने सापडणारे रुग्णही मोठ्या प्रमाणात वाढू लागले आहेत. जिल्ह्यात आज पुन्हा ४ हजार ७१७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. सलग चौथ्या दिवशी सुमारे पावणेपाच हजार नवे रुग्ण सापडले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

आजच्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ९०९ रुग्ण आहेत.  आज पिंपरी-चिंचवडमध्ये १ हजार ३६३, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात १ हजार ३४, नगरपालिका क्षेत्रात ३१९ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रात ९२ नवे रुग्ण सापडले आहेत. 

याशिवाय आज ९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक ४१ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील १६ , जिल्हा परिषद क्षेत्रातील २४, नगरपालिका क्षेत्रातील ७ आणि  कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील दोन रुग्ण आहेत. रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही काल (ता. ११) रात्री ९ वाजल्यापासून आज (ता. १२) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.

मराठा आरक्षणावरून शासनाचाच 'गोंधळात गोंधळ'; सुधारित आदेश काढल्याने विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा​

दरम्यान, आज दिवसभरात ३ हजार ८२७ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये पुणे शहरातील १ हजार ४६४, पिंपरी चिंचवडमधील १ हजार ५२७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ६११, नगरपालिका क्षेत्रातील १८२ आणि कॅंटोन्मेंट बोर्डातील ४३ जण आहेत. यामुळे कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या आता १ लाख ७४ हजार ६२७ झाली आहे. दरम्यान, आतापर्यंत ५ हजार ५९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील 
१७१ जण आहेत.

संस्थानिहाय कोरोनामुक्त रुग्ण 

  • पुणे महापालिका क्षेत्र ---- ९७ हजार ४८९.
  • पिंपरी चिंचवड ---- ५१ हजार ४५०.
  • जिल्हा परिषद ---- १७ हजार ६७.
  • नगरपालिका ---- ५ हजार ८७.
  • कॅंटोन्मेंट बोर्ड ---- ३ हजार ५३४.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com