Corona Updates: पुणे जिल्ह्यात वाढले दुप्पट रुग्ण; पिंपरी-चिंचवडमध्ये सर्वाधिक

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 18 November 2020

नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवार (ता.१७) रात्री ८ वाजल्यापासून बुधवारी (ता.१८) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

पुणे : पुणे जिल्ह्यात मंगळवारच्या (ता.१७) तुलनेत बुधवारी नवीन कोरोना रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. जिल्ह्यात बुधवारी (ता.१८) ७२२ कोरोना रुग्ण आढळून आले असून २३ जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी ३६८ नवे रुग्ण आढळून आले होते. याऊलट बुधवारी नवीन रुग्णांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या कमी झाली आहे. दिवसभरात ६ हजार १४४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.

बुधवारी ५२४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. आजच्या एकूण कोरोना रुग्णांमध्ये पुणे शहरातील ३८४ जण आहेत. एकूण मृत्यूंमध्ये पुणे शहरातील सहा, पिंपरी-चिंचवड चार, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील नऊ, नगरपालिका आणि कॅंन्टोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील प्रत्येकी दोन रुग्णांचा समावेश आहे.

Breaking : पुलवामात दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला; १२ नागरिक जखमी​

पुणे जिल्ह्यात सध्या विविध रुग्णांलयात ३ हजार ८५६ कोरोना रुग्ण उपचार घेत आहेत. याशिवाय ५ हजार ५६४ रुग्णांवर त्यांच्या घरातच उपचार करण्यात येत आहेत. जिल्ह्यातील आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या आता ३ लाख ३२ हजार ८६७ झाली आहे. यापैकी आतापर्यंत ३ लाख १५ हजार ३९१ कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत ८ हजार २१९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ३८५ रुग्ण आहेत.

बुधवारी पिंपरी-चिंचवडमध्ये १५८, जिल्हा परिषद क्षेत्रात १३३, नगरपालिका क्षेत्रात ४१ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ६ नवे रुग्ण सापडले आहेत. नवे कोरोना रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूची संख्या ही मंगळवार (ता.१७) रात्री ८ वाजल्यापासून बुधवारी (ता.१८) रात्री आठ वाजेपर्यंतची आहे.

- पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Pune district 722 corona patients have been found in one day