पुणे जिल्हा बँक निवडणूक : आप्पासाहेब जगदाळे यांचा अ वर्गातून अर्ज दाखल

आप्पासाहेब जगदाळे यांचे बँकेवर गेली १९ वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे.
आप्पासाहेब जगदाळे यांचा अ वर्गातून अर्ज दाखल
आप्पासाहेब जगदाळे यांचा अ वर्गातून अर्ज दाखलsakal

इंदापूर : पुणे जिल्ह्यातील सहकारातील दिग्गज नेते तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे विद्यमान संचालक आप्पासाहेब जगदाळे यांनी बँक निवडणुकीत संचालकपदासाठी इंदापूर तालुका प्रतिनिधी 'अ' वर्ग मतदारसंघातून दि. ६ डिसेंबर रोजी अर्ज दाखल केला. आप्पासाहेब जगदाळे यांनी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या विशेष उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी मिलींद सोबले यांच्याकडे दाखल केला.

आप्पासाहेब जगदाळे यांचे बँकेवर गेली १९ वर्षांपासून निर्विवाद वर्चस्व आहे. सर्वसामान्य शेतकरी विकासाचा केंद्रबिंदू मानून त्यांनी काम केले आहे. इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापतीपद भूषवून त्यांनी बाजार समितीची सत्ता एकहाती ठेवली आहे.इंदापूर "अ" वर्ग प्रतिनिधी सोसायटी मतदार संघा तून १८५ मतदार प्रतिनिधी आहेत. त्यांचा विजय निवडणुकीत निश्चित असल्याची चर्चा आहे.

आप्पासाहेब जगदाळे यांचा अ वर्गातून अर्ज दाखल
शिवसेना म्हणजे डबल ढोलकी : चंद्रकांत पाटील

विधानसभा निवडणुकीत ठरल्याप्रमाणेआमदार कीचे तिकीट जगदाळे यांना न मिळाल्याने त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी फारकत घेऊन भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांना पाठिंबा दिला. त्यावेळेपासून ते श्री. पाटील यांच्या समवेत काम करत आहेत. कर्मयोगी कारखाना निवडणूक बिनविरोध करण्यासाठी त्यांनी श्री. पाटील यांना अनमोल मदत केली. त्यामुळे आता श्री. पाटील त्यांना मदत करणार असल्याने त्यांचे पारडे जड आहे. त्यामुळे बँकेत भाजपा विचारांचा प्रतिनिधी जाणार असल्याचे संकेत आहेत. आगामी निवडणुका लक्षात घेता जगदाळे यांना रोखण्यासाठी राष्ट्रवादी काय पवित्रा घेते याकडे राजकीय धुरीणांचे लक्ष लागले आहे.

यावेळी ऍड कृष्णाजी यादव, पृथ्वीराज जाचक, मयुरसिंह पाटील, मोहन दुधाळ, देवराज जाधव, मारुतराव वनवे,विलास वाघमोडे, मुरलीधर निंबाळकर, किरण बोरा आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com