पुणे जिल्हा बॅंक अजूनही देशात पहिल्या क्रमांकावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 16 जानेवारी 2019

पुणे - केंद्र आणि राज्य सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे (पीडीसीसी) मोठे आर्थिक नुकसान झाले असले, तरी बॅंक अजूनही देशात क्रमांक एकवरच आहे. बॅंक आर्थिकदृष्ट्या पूर्वीएवढीच सक्षम आहे. ठेवीदारांच्या ठेवींना किंचितही धक्का लागणार नाही. त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष रमेश थोरात यांनी केले आहे. 

थोरात म्हणाले, ‘‘जिल्हा बॅंकेला नोटाबंदी आणि पीककर्ज माफीच्या निर्णयाची मोठी आर्थिक झळ बसली. यामुळे बॅंकेचे किमान ३८ कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र हे नुकसान जिल्हा बॅंकेच्या दृष्टीने किरकोळ आहे. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी आणि बॅंकेला पूर्वीएवढाच नफा पुन्हा मिळावा, यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने कितीही आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न केला, तरी बॅंक डगमगणार नाही.’’ 

‘‘बॅंकेला दरवर्षी सुमारे १०० कोटींहून अधिक नफा होत असे. त्यामुळे ही बॅंक नेहमीच देशातील सर्वांधिक श्रीमंत बॅंक म्हणून ओळखली जात असे. मात्र चुकीच्या सरकारी धोरणांमुळे एकूण ७४ कोटी ५२ लाखांचे नुकसान झाले आहे.’’

Web Title: Pune District Bank Topper in India