Vidhansabha 2019 : पुणे जिल्हा काँग्रेसला बारामतीत इच्छुकही मिळेना       

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

- पुणे जिल्हा काँग्रेसला बारामतीत इच्छुकही मिळेना  
- जिल्ह्यातील विधानसभेच्या १० जागांसाठी केवळ २० जण इच्छुक, 
- चार विधानसभेसाठी प्रत्येकी एकच इच्छुक     

पुणे : पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील दहा विधानसभा मतदारसंघाच्या काँग्रेसच्या उमेदवारीसाठी केवळ २० जणच इच्छुक आहेत. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बारामती मतदारसंघात तर काँग्रेसला एकही इच्छुक मिळालेला नाही. शिवाय जुन्नर, खेड, दौंड आणि इंदापूर मतदारसंघात प्रत्येकी एक जणच इच्छुक आहे. यावरून जिल्हा काँग्रेसमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी मोठे निरुत्साही वातावरण असल्याचे दिसते आहे. 
                     
काँग्रेस इच्छुकांच्या मुलाखती सोमवारी (ता. २९) घेण्यात आल्या. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे निरीक्षक प्रकाश यलगुलवार, सत्यजीत देशमुख, अल्का राठोड आणि पुणे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी या मुलाखती घेतल्या.    

विधानसभानिहाय इच्छुक      जुन्नर - १; आंबेगाव - २, खेड - १; शिरुर - ३; दौंड - १; इंदापूर  - १; पुरंदर - २; भोर - ३, मावळ - ६ आणि बारामती - ००.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Pune District Congress did not find any interest in Baramati