coronavirus : कोरोनाशी संबंधित कर्मचार्यांना १ कोटींचा विमा; पुणे जिल्हा परिषदेचा निर्णय

pune-zp
pune-zp

पुणे - जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कोरोना प्रतिबंधासाठी क्षेत्रीय स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना प्रत्येकी १ कोटी रुपयांचे विमा संरक्षण देण्याचा निर्णय पुणे जिल्हा परिषदेने घेतला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील तालुका वैद्यकीय अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, आशा स्वयंसेविका, सर्व गट विकास अधिकारी, ग्रामसेवक आणि अंगणवाडी सेविका आदींचा समावेश असणार आहे. जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, आरोग्य सभापती प्रमोद काकडे आणि मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या संयुक्त बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची माहिती उपाध्यक्ष शिवतरे यांनी बुधवारी (ता.१)  दिली.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जिल्हा परिषदेच्या या निर्णयाचा जिल्ह्यातील आठ हजार ५३१ अधिकारी व कर्मचाऱ्यांना लाभ होणार आहे. यामध्ये १३ गट विकास अधिकारी, १३ तालुका वैद्यकीय अधिकारी, १८४ वैद्यकीय अधिकारी, १५ आरोग्य पर्यवेक्षक, २३६ आरोग्य सहाय्यक, ५३५ आरोग्य सेविका, १९७ आरोग्य सेवक, २ हजार ८७६ आशा स्वयंसेविका, ९०२ ग्रामसेवक आणि तीन हजार ५५७ अंगणवाडी सेविकांचा समावेश असणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com