Fertilizer : पुणे जिल्ह्यातील खरिपासाठी पावणेतीन लाख टन खते; कृत्रीम टंचाई करणाऱ्यांवर होणार कारवाई

पुणे जिल्ह्यातील खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी पावणेतीन लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि ३० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली.
fertilizer
fertilizersakal

पुणे - जिल्ह्यातील खरीप हंगामातील विविध पिकांच्या पेरण्यांसाठी पावणेतीन लाख मेट्रिक टन रासायनिक खते आणि ३० हजार क्विंटल बियाणे उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यापैकी प्रत्यक्षात आजअखेरपर्यंत ८० टक्के साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात खते व बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे कृषी विभागातून सांगण्यात आले. दरम्यान, खते व बियाणांची जाणीवपूर्वक कृत्रीम टंचाई निर्माण करून त्याची जास्त दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर वॉच ठेवण्यासाठी १४ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे.

पुणे जिल्ह्यातील तेरापैकी हवेली, मावळ, मुळशी, भोर, वेल्हे, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे आठ तालुके खरीप तालुके म्हणून ओळखले जातात. या तालुक्यांमधील मिळून जिल्ह्यातील एक हजार ३८० गावे हे खरीप गावे आहेत. जिल्ह्याचे खरिपाचे एकूण सरासरी क्षेत्र (उसासह) तीन लाख ६२ हजार हेक्टर एवढे आहे. यापैकी खरीप पिकांसाठी एक लाख ९५ हजार हेक्टर क्षेत्र उपलब्ध आहे.

जिल्ह्याला उपलब्ध होणाऱ्या एकूण रासायनिक खतांमध्ये युरिया ३८ हजार ९३६ मेट्रिक टन आणि उर्वरित संयुक्त आणि सरळ खते आहेत. खरिपातील पिकांसाठी पुणे जिल्ह्याला रासायनिक खते आणि बियाणांचा पुरेसा साठा उपलब्ध झाला आहे. त्यामुळे खते, बियाणांची टंचाई निर्माण होणार नसल्याचे कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

प्रमुख पिकांचे सरासरी क्षेत्र (हेक्टरमध्ये)

- भात --- ६० हजार २००

- बाजरी --- ३६ हजार ५६०

- मका --- २९ हजार

- सोयाबीन --- ३७ हजार ५००

- रागी --- ३ हजार ३००

- खरीप ज्वारी --- ३००

- मूग --- १५ हजार ३०

- तूर --- १ हजार ६००

- उडीद --- १ हजार ५६०

- भुईमूग --- १४ हजार

fertilizer
Pune Municipal Engineers : पुणे महापालिकेतील तीन अभियंत्यांवर बोगस अनुभवाचा ठपका

प्रमुख पिकांचे बियाणे मागणी (क्विंटलमध्ये)

- भात --- १२ हजार २०१.

- सोयाबीन --- १०हजार ३५०.

- मका --- २ हजार ४३०.

- संकरित बाजरी --- ४००.

- भुईमूग --- ५८६.

- वाटाणा --- ९८८.

- मूग --- १४४.

- तूर --- ९५.

- उडीद --- ११३.

- संकरित ज्वारी --- ३८.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com