पुणे जिल्हा दूध संघात आर्थिक अनगोंदी; सहकार खात्याची नोटीस

pune district milk society gets notice from state co operative department
pune district milk society gets notice from state co operative department

मुंबई : पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघात मोठ्या प्रमाणात आर्थिक अनागोंदी आढळून आली असून, संघाने 31 जानेवारीपर्यंत समाधानकारक खुलासा न केल्यास प्रशासकाची नियुक्‍ती करण्याबाबतची नोटीस सहकार विभागाने बजावली आहे.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने अनेक बाबतीत आर्थिक अनियमितता केल्याचे सहकार विभागाच्या नोटिसमध्ये म्हटले आहे. संघाला महाराष्ट्र शासनाने पन्नास टक्‍के सवलतीच्या दरात कात्रज येथे जमीन दिली असून दुध संघाच्या पुनरुज्जीवन योजनेखाली केंद्र व राज्य सरकारने 5 कोटी 30 लाख रुपयांचे अर्थसाह्य केले आहे. त्यामुळे संघाने सहकार कायद्याचे तंतोतंत पालन करणे आवश्‍यक असताना संचालक मंडळाने मनमानी कारभार केल्याचे सहकार विभागाचे म्हणणे आहे. तसेच खुले दूध विक्री करण्यास परवानगी दिलेल्या लहान संघांकडेही मोठ्या प्रमाणात थकबाकी असताना पुणे जिल्हा संघ कोणतीही कार्यवाही करत नसल्यामुळे संघाचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. यापैकी पराग डेअरीकडून 5 कोटी 98 लाख रुपयांची थकबाकी असल्याची बाब नोटिशीमध्ये नमूद केली आहे. सर्व मुद्यांवर 31 जानेवारीपर्यंत योग्य खुलासा न केल्यास संघावर प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात येणार असल्याचा इशारा सहकार विभागाने दिला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ►क्लिक करा

दूध संघावरील आक्षेप 

  • संघाच्या सेवकांच्या बदल्या-पदोन्नतीसाठी योग्य धोरण नाही 
  • सभासद प्राथमिक दूध संस्थांकडून करारनामे नाहीत 
  • 240 दिवसांपेक्षा कमी दिवस दूध पुरवठा करणाऱ्या संस्थांवर कारवाई नाही 
  • आर्थिक पत्रके वेळेत सादर न करणे 
  • संचालक मंडळाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 36 लाख 53 हजार रुपयांची उधळपट्टी करणे 
  • दूध बिले देताना ऑडिट विभागाने निश्‍चित केलेल्या रकमेपेक्षा दुप्पट रक्‍कम मंजूर करणे 

आर्थिक अनियमिततेबाबत पुणे जिल्हा सहकारी दूध संघाला 31 जानेवारी किंवा त्यापूर्वी खुलासा करण्यासाठी नोटीस दिली आहे. खुलासा समाधानकारक नसल्यास प्रशासकाची नियुक्‍ती करण्यात येईल. 
- सुनील शिरापूरकर, विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे 

जिल्हा दूध संघ मागील दहा वर्षांपासून सातत्याने नफ्यात  आहे. संघाचा अ वर्ल्ड दर्जा आहे. गेल्या चार वर्षांत शेतकऱ्यांना २५ कोटी रुपयांचे बोनस वाटप केले असून संघाचे सर्व कामकाज नियमानुसारच आहे. कामकाजाबाबत एकाही शेतकऱ्याची तक्रार नाही. त्यामुळे संघाला कारवाई बाबत पाठवलेली नोटीस हा खोडसाळपणा आहे. 
-विष्णू हिंगे, चेअरमन, जिल्हा दूध संघ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com