पुणे जिल्ह्यातील 12 ग्रामपंचायतीचे सरपंच बिनविरोध

संतोष आटोळे
शुक्रवार, 18 मे 2018

शिर्सुफळ: पुणे जिल्ह्यातील जुन ते सप्टेंबर 2018 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 90 ग्रामपंचायती पैकी 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या तसेच सदस्य पदाच्या 834 जागांपैकी 268 सदस्यांची बिनविरोध निवड झाली तर एकही अर्ज न दाखल झाल्याने सरपंच पदाच्या 2 व सदस्य पदाच्या 78 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामुळे आता 76 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी 226 व 488 सदस्य पदासाठी 1160 उमदेवार निवडणुक रिंगणात काम राहिले आहेत. रविवार (ता.27) मे रोजी मतदान होणार आहे.तोपर्यत ऐन उन्हाळ्यात ग्रामीण भागात प्रचाराचा धडाका उडणार आहे.

जिल्ह्यातील 90 ग्रामपंचायतीपैकी बारामती व मावळ तालुक्यातील प्रत्येकी तीन, खेड तालुक्यातील दोन व  दौंड, इंदापूर, आंबेगाव, शिरुर तालुक्यातील प्रत्येकी एक ग्रामपंचायत अशा एकुण 12 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या आहेत.तर भोर व खेड मधील प्रत्येकी एक ग्रामपंचायतीचे सरपंच पद एकही अर्ज  दाखल न झाल्याने रिक्तच राहिले आहे. ग्रामपंचायत सदस्यांच्या 834 जागांपैकी 268 जागी बिनविरोध निवडी झाल्या आहेत. यामध्ये वेल्हे 6, भोर 26, पुरंदर 17, दौंड 14, बारामती 48, इंदापूर 19, जुन्नर 4, आंबेगाव 31, खेड 53, शिरुर 19, मावळ 27, मुळशी 4 सदस्यांचा समावेश आहे. तर सदस्य पदामध्ये 78 जागा रिक्त राहिल्या आहेत. यामध्ये भोर 11, पुरंदर 26, दौंड 17, बारामती 2, आंबेगाव 6, खेड 7 व शिरुर, मावळ, वेल्हा, जुन्नर प्रत्येकी 1  जागेचा समावेश आहे.

सरपंच पदाची एकही पोटनिवडणुक नाही...
जिल्ह्यातील सात ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाच्या पोटनिवडणुका आहेत. मात्र यापैकी भोर व खेड मधिल प्रत्येकी एका ग्रामपंचायतीचे सरपंच पद बिनविरोध झाले आहे तर वेल्हा दोन व  भोर, जुन्नर व आंबेगाव प्रत्येकी एक अशा पाच ग्रामपंचायतीचे सरपंच पद एकही अर्ज न आल्याने पुन्हा रिक्त राहणार आहे. तर सदस्य पदाच्या 391 जागांपैकी 93 जागा बिनविरोध 282 जागा रिक्त व 16 सदस्य पदाच्या साठी 38 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

तालुका, सरपंच निवडणुक होणारी ग्रामपंचायत संख्या, सरपंच पदासाठी अर्ज संख्या, तर कंसात निवडणुक लागलेली सदस्य संख्या, व उमेदवार संख्या खालील प्रमाणे..
1) वेल्हे - 1 - 2 ( बिनविरोध)
2) भोर - 5 - 12 (6 -12 )
3) पुरंदर - 13 - 41 (76 - 222)
4) दौंड - 9 - 31 (93 -235)
5) बारामती - 12 - 38 (88 - 194 )
6) इंदापूर -  4 - 11 (36 - 84)
7) जुन्नर - 3 - 11 (30 - 73)
8) आंबेगाव - 9 - 27 (51 -112 )
9) खेड - 10 - 26 - (37 - 80)
10) शिरुर - 5 -16 - (41 - 87)
11) मावळ - 4 - 9 (27 - 55)
12) मुळशी - 1 - 2 - (3 - 6 )
एकुण - 76 - 226 (488 - 1160)

Web Title: Pune district Sarpanch of 12 Gram Panchayats in uncontested