Corona Update : पुणे जिल्हात रुग्णसंखेत वाढ; बरे होणाऱ्या रुग्णांची स्ंख्याही घटली | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

corona update

पुणे जिल्हात रुग्णसंखेत वाढ; बरे होणाऱ्या रुग्णांची स्ंख्याही घटली

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे जिल्ह्यात रविवारी (ता. १४) दिवसभरात २५४ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. शनिवारच्या तुलनेत रविवारी नवीन रुग्ण संख्येत ९ ने वाढ झाली आहे. दिवसभरात जिल्ह्यात ४ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा: Video: बोल्टची 'स्मार्ट' गोलंदाजी... वॉर्नरचा उडवला त्रिफळा!

याऊलट २३३ जण कोरोनामुक्त झाले आहेत. रविवारी दिवसभरातील पुणे जिल्ह्यातील कोरोनामुक्त रुग्णांची संख्या शनिवारच्या तुलनेत कमी झाली आहे. दिवसातील एकूण रुग्णांत पुणे शहरातील १०८ नवीन रुग्ण आहेत. शहरातील नवीन रुग्णांतही १६ ने‌ वाढ झाली आहे.

पुणे जिल्ह्यातील एकूण मृत्यूमध्ये पुणे शहरातील दोन आणि पिंपरी चिंचवड व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. दिवसातील एकूण रुग्णांत शहरातील १०८ रुग्णासोबतच पिंपरी चिंचवडमधील ५२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ७९, नगरपालिका हद्दीतील १२ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन नवे रुग्ण आहेत.

हेही वाचा: किवींचा पुन्हा ये रे माझ्या मागल्या शो; कांगारु टी-20 चॅम्पियन!

एकूण कोरोनामुक्त रुग्णात पुणे शहरातील ९४, पिंपरी चिंचवडमधील ५९, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५६, नगरपालिका हद्दीतील १८ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील तीन जण आहेत. सद्यःस्थितीत पुणे जिल्ह्यात २ हजार ५८ सक्रीय कोरोना रुग्ण आहेत. यापैकी १ हजार ९४ रुग्णांवर विविध रुग्णांलयात उपचार सुरु आहेत. उर्वरित ९६४ जण गृह विलगीकरणात आहेत.

loading image
go to top