पुणे: धायरीत बॉम्बसदृश वस्तू सापडल्याने खळबळ

bullet.jpg
bullet.jpg

पुणे : धायरीत बॉम्बसदृश वस्तू सापडल्यामुळे परिसरात जिवंत बॉम्ब सापडल्याची अफवा पसरली होती. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये काहीकाळ भिती निर्माण झाली होती. 

धायरी रस्त्यावर गुरुवारी दुपारी सव्वा दोन वाजता कचराकुंडीजवळ बॉम्बसदृश्य वस्तू कचरावेचकांना संबंधित वस्तु आढळली. त्यांनी तत्काळ पोलिसांना खबर दिली. सिंहगड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासनी केली असता युद्धप्रसंगी वापरले जाणारे बॉम्बसदृश्य रणगाडाविरोधी बुलेट सापडले आहे. 

सदर वस्तू परिसरात कोठून आली याबाबत पोलिस तपास करत आहे. तुर्तास सदर वस्तू पुणे लष्कराकडे सोपविण्यात आले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com