पुणे विभागाचा बारावीचा 89.58 टक्के निकाल

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा पुणे विभागाचा निकाल एकूण 89.58 टक्के लागला. त्यामध्ये सर्वाधिक पुणे जिल्ह्याचा 89.84 टक्के, त्यानंतर नगरचा 89.25 टक्के, तर सोलापूरचा 89.36 टक्के निकाल लागला. 

पुणे विभागात एकूण दोन लाख 35 हजार 502 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यापैकी दोन लाख 10 हजार 963 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. पुणे जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक 96.30 टक्के, वाणिज्य 89.96 टक्के, व्यवसाय अभ्यासक्रम 83.47 टक्के आणि कला शाखेचा 76.38 टक्के निकाल लागला. नगर जिल्ह्यात विज्ञान विभागाचा सर्वाधिक 97.29 टक्के, कला विभाग 75.46 टक्के, वाणिज्य विभाग 92.75 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रम 81.66 टक्के निकाल लागला. सोलापूर जिल्ह्यात विज्ञान विभागाचा 97 टक्के, कला विभाग 79.92 टक्के, वाणिज्य विभाग 92.93 टक्के आणि व्यवसाय अभ्यासक्रमाचा 85.64 टक्के निकाल लागला. 

पुणे विभागातील मुली हुशार 
पुणे विभागात एकूण 94.34 टक्के मुली उत्तीर्ण आणि 85.90 टक्के मुले उत्तीर्ण झाली. त्यामुळे राज्यासह पुणे विभागातदेखील यंदाच्या वर्षी मुलींनी बाजी मारली.

Web Title: Pune division HSC result 89.58 percent results