पुणे विभागात कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले

Corona-patient
Corona-patient

पुणे - पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये कोरोनाबाधित रुग्ण बरे होणाचे प्रमाण 80.70 टक्के इतके आहे. मागील आठवडाभरात ते 78.10 टक्‍के होते. या आकडेवारीवरून बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र दिसून येत आहे. तसेच, पुणे जिल्ह्यातही बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण 81.82 टक्‍क्‍यांवरून 83.85 टक्‍क्‍यांवर पोचले आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पुणे विभागातील पुण्यासह, कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या चार लाख 30 हजार 593 झाली आहे. त्यापैकी तीन लाख 47 हजार 484 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 71 हजार 761 इतकी आहे. तर, 11 हजार 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. विभागात 18 लाख 90 हजार 504 नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. त्यापैकी 4 लाख 40 हजार 593 नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आहे. 

पुणे जिल्ह्यात रुग्णांची संख्या दोन लाख 80 हजार 723 आहे. त्यापैकी दोन लाख 35 हजार 384 रुग्ण बरे झाले आहेत. सध्या उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या 39 हजार आहे. तर, सहा हजार 335 रुग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली. 

बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आणि कंसात मृत्यू, टक्‍क्‍यांत (पुणे विभाग) 
24 सप्टेंबर 78.10 (2.62) 
25 सप्टेंबर 78.51 (2.62) 
26 सप्टेंबर 79.12 (2.62) 
27 सप्टेंबर 79.53 (2.62) 
28 सप्टेंबर 80.13 (2.25) 
29 सप्टेंबर 80.70 (2.64) 

बरे होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण आणि कंसात मृत्यू, टक्‍क्‍यांत (पुणे जिल्हा) 
24 सप्टेंबर 81.82 (2.23) 
25 सप्टेंबर 82.09 (2.24) 
26 सप्टेंबर 82.26 (2.24) 
27 सप्टेंबर 82.68 (2.24) 
28 सप्टेंबर 83.23 (2.25) 
29 सप्टेंबर 83.85 (2.26)

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com