पुणेकरांचे `नो हॉर्न प्लीज' 

पुणेकरांचे `नो हॉर्न प्लीज' 

पुणे : कर्णकर्कश्‍श हॉर्न वाजवून वाहनचालकांसह पादचाऱ्यांमध्ये काही क्षणांसाठी घबराट निर्माण करण्याचे प्रकार काही बेशिस्त वाहनचालकांकडून सर्रासपणे केले जातात. अशा वाहनचालकांबरोबरच सगळ्याच वाहनचालकांनी शक्‍यतो, हॉर्न वाजवू नये यासाठी "लाइफ सेव्हिंग फाउंडेशन'तर्फे दर रविवारी चौकाचौकांमध्ये जनजागृती केली जात आहे. ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी दोन महिन्यांत तब्बल 25 हजार जणांनी याला प्रतिसाद देत या उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. 

कर्णकर्कश्‍श हॉर्नमुळे निर्माण होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा होणारा गंभीर परिणाम लक्षात घेऊन "लाइफ सेव्हिंग फाउंडेशन' या संस्थेने ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या रविवारपासून शहरामध्ये "नो हॉकिंग डे' हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. दर रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांतील चौकांमध्ये थांबून वाहनचालकांना गरज नसल्यास हॉर्न वाजवू नका, असे आवाहन करीत संस्थेचे कार्यकर्ते जागृती करीत आहेत.

या उपक्रमास खासगी कॅबचालक, रिक्षा संघटना, काही डॉक्‍टर संघटना, मेडिकलचालक विविध महाविद्यालयांनीही पाठिंबा दिला आहे. या उपक्रमास दोन महिने पूर्ण झाले असून, आज सकाळी नऊ वाजता बाणेर रस्त्यावर वाहनचालकांमध्ये जागृती करण्यात आल्याचे "लाइफ सेव्हिंग फाउंडेशन'चे अध्यक्ष देवेंद्र पाठक यांनी सांगितले. 

हॉर्न वाजविण्याचे दुष्परिणाम 
* ध्वनिप्रदूषणामध्ये वाढ 
* वृद्ध, लहान मुले व रुग्णांमध्ये घबराट 
* अपघात होण्याची शक्‍यता 
* मानसिक ताण, कर्णबधिरपणा, चिडचिडेपणा 

हॉर्न न वाजविण्याचे फायदे 
* ध्वनिप्रदूषणावर नियंत्रण 
* सुरक्षित व तणावमुक्त प्रवास 
* वेगावर नियंत्रण 
* वाहतुकीच्या नियमांचे पालन 

हॉर्नमुळे नागरिकांएवढाच पक्षी, प्राण्यांनाही त्रास होतो. शहरातील शांततेचा भंग होतो. एक जबाबदार नागरिक या नात्याने मी स्वतः हॉर्न वाजवीत नाही. वाहन चालविताना गरज नसल्यास हॉर्न वाजवू नये. 
- भाग्यश्री कुलकर्णी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com