पुणे : फुरसुंगी PMT आगाराची गरुड झेप

फुरसुंगी आगारामध्ये सोमवारी उच्चांकी उत्पनाची नोंद झाली.
pmt
pmtsakal

फुरसुंगी: पीएमटीच्या भेकराईनगर फुरसुंगी आगारामध्ये सोमवारी उच्चांकी उत्पनाची नोंद झाली. येथे इ बस चे नव्वद टक्के प्रमाण आहे.सकाळ आणि दुपार पाळीमध्ये या सर्व बस मार्गावर होत्या.पास विक्री धरून या दिवशी १०,०३,७४७ एवढ्या उत्पपणाची नोंद झाली.या दिवशी पूर्ण पीएमटी चे एक कोटी चौदा लाख चारशे अठरा एवढ्या रकमेची नोंद झाली,यामध्ये फुरसुंगी आगाराने बाजी मारली.

करोना काळानंतरची ही सर्वात उच्चांकी नोंद ठरली.करोनाचे सर्व निर्बंध हटवल्याने आणि सासवड मार्गावर मोरगाव आणि जेजुरी पर्यंत नवीन मार्ग चालू केल्याने येथील नागरिकांनकडून बस ला पसंती दिली जात असल्याने उत्पन्नात वाढ करू शकलो,असे फुरसुंगी आगाराचे प्रमुख दीपक वाळुंजकर यांनी सांगितले.पीएमटी चे अध्यक्ष व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा,संयुक्त व्यवस्थापकीय संचालक चेतना केरुरे,वाहतूक व्यवस्थापक राजेश रुपणवर,सतीश गव्हाणे यांच्या मार्गदर्शन आणि नियोजनानुसार काम करत असताना वाहनचालक,वाहक आणि आगारातील अधिकारी स्वतः बस मधून प्रवास करत तिकीट तपासणी करत असल्याने यश मिळाले असेही यावेळी त्यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com