पुणे : पहाटेच्या आकाशात पाहा ग्रहांचे संमेलन | Pune News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Meeting of the planet

पुणे : पहाटेच्या आकाशात पाहा ग्रहांचे संमेलन

पुणे : पहाटेच्या आकाशात पूर्वेकडे सध्या ग्रहांचे संमेलन भरत आहे. अगदीच सूर्योदयापूर्वी आपल्या सर्वांना सूर्यमालेतील या अनोख्या घटनेचे साक्षीदार बनता येणार आहे. फक्त आवश्यकता आहे मोकळ्या जागेची आणि पहाटे लवकर उठण्याची...

संमेलनातील ग्रह

सूर्यमालेतील गोलाकार कडे असलेला शनी, मंगळ, शुक्र आणि गुरू ग्रहांची युती सध्या पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे येत्या शनिवार व रविवारी चंद्रही यामध्ये सामील होत आहे. या ग्रहांमध्ये सध्या शुक्र सर्वाधिक तेजस्वी आहे.

ग्रहांची युती म्हणजे काय

सूर्यानंतर ओळीत सर्व ग्रह पाहिल्यास प्रथम बुध, शुक्र नंतर तिसऱ्या क्रमांकावर पृथ्वी येते. त्यानंतर मंगळ, गुरू, शनी, युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो हे ग्रह आहेत. हे सर्व ग्रह आपापल्या कक्षेमध्ये सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करतात. सूर्य प्रदक्षिणा करताना कधीकधी हे ग्रह सूर्यासापेक्ष एका रेषेमध्ये येतात, या घटनेस युती असे म्हणतात. सध्या पूर्वेच्या आकाशात शनी, मंगळ, शुक्र आणि गुरूची युती झाली आहे.

कसे पाहणार?

उघड्या डोळ्यानेही आपल्याला ही युती दिसणार आहे. मोकळ्या जागेवरून किंवा टेरेसवरून हे संमेलन पाहता येणार आहे. शक्यता जिथे प्रकाश कमी आहे. अशा जागेची निवड करावी. तुमच्याकडे दुर्बीण असेल तर त्याहूनही उत्तम. सूर्याच्या प्रकाशामुळे ग्रहांच्या कला आणि शनीच्या कडाही तुम्ही पाहू शकता.

बालगंधर्वजवळ दुर्बिणींची व्यवस्था

ज्योतिर्विद्या परिसंस्थेच्या वतीने बालगंधर्व रंगमंदिरा जवळील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलावर दुर्बिणींची व्यवस्था करण्यात येणार आहे. शनिवार आणि रविवार पहाटे चार ते सकाळी सहा वाजेपर्यंत हा कार्यक्रम आहे. कार्यक्रम विनामूल्य असून सर्वांसाठी खुला आहे.

Web Title: Pune East Side Early Morning Sky Planet Meeting

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Pune NewsmoonPlanetsky