Ecoconnect Startup : निसर्गाशी कनेक्ट करणारे मोनाली शहा यांचे स्टार्टअप ‘इकोकनेक्ट’

देशी झाडे कोणती आहेत, यासह निसर्गचक्राशी जोडले जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींसाठी हे स्टार्टअप महत्त्वाचे काम करीत आहे.
Ecoconnect startup
Ecoconnect startupsakal
Summary

देशी झाडे कोणती आहेत, यासह निसर्गचक्राशी जोडले जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींसाठी हे स्टार्टअप महत्त्वाचे काम करीत आहे.

पुणे - बंगला, सोसायटी, टाऊनशिप किंवा प्लॉटिंगच्या आवारात चांगली झाडे लावायची आहे. विविध कारणांसाठी वृक्षारोपण करायचे आहे. कंपनीच्या आवारात झाडांची लागवड करायची आहे. मात्र कोणते झाडे लावली तर त्यांचा फायदा होर्इल. ही झाडे नेहमी कशी व किती लावली पाहिजेत, हे अनेकांना समजत नाही. त्यामुळे परदेशी झाडे लावली जातात व नंतर लक्षात येते, की आपण चुकीच्या पद्धतीने चुकीची झाले लावली आहेत.

पर्यावरणाची, देशीझाडांची आणि लँडस्केपिंगची माहिती नसल्याने या चुका घडतात आणि पर्यावरणीय संकटावेळी ही चूक लक्षात येते. त्यामुळे निसर्गाशी कनेक्ट वाढवता येत नाही आणि लावलेल्या झाडांमुळे पर्यावरणाला आणि आपल्यालादेखील काहीच फायदा होत नाही. चांगल्या उद्देशाने हाती घेतलेला असा उपक्रम फसू नये, म्हणून एका आर्किटेक्ट महिलेचे स्टार्टअप मार्गदर्शक ठरत आहे. नागरिकांना निसर्गाशी कनेक्ट करण्याचे काम ‘इकोकनेक्ट’ (Eco-connect) हे स्टार्टअप करीत आहे. कोणत्या ठिकाणी कोणत्या झाडांची लागवड करावी. तेथील जमिनीचे लँडस्केपिंग कसे हवे.

देशी झाडे कोणती आहेत, यासह निसर्गचक्राशी जोडले जाऊन पर्यावरण संवर्धनासाठी आवश्‍यक असलेल्या बाबींसाठी हे स्टार्टअप महत्त्वाचे काम करीत आहे. तसेच नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयक जनजागृती व्हावी व अधिक चांगल्या पद्धतीने निसर्गाची निगा राखली जावी, यासाठी विविध उपक्रम या स्टार्टअपच्या माध्यमातून हाती घेण्यात आले आहेत. आर्किटेक्ट मोनाली शहा यांनी या स्टार्टअपची गेल्यावर्षी स्थापना केली आहे. पदव्युत्तर पदवीचे शिक्षण घेतल्यानंतर शहा यांनी जैवविविधतेमध्ये पदव्युत्तर पदवी मिळवली. त्यानंतर वनस्पतीशास्त्र आणि पक्षांच्या संबंधित शिक्षण घेतले. त्यांनी २२ वर्षे आर्किटेक्चर व लँडस्केपमध्ये काम केले आहे.

निसर्गचक्र कायम राखण्याचा प्रयत्न

लँडस्केपिंग कसे झाले यावर तेथील पर्यावरणीय प्रवास ठरतो. कारण तेथे झाडांबरोबर पक्षी, फुलपाखरे, सूक्ष्मजीव व छोटे प्राणीदेखील असतात. त्या सर्वांचा एकमेकांशी कनेक्ट राहिला पाहिजे. हा कनेक्ट टिकवून ठेवत तो वाढविण्यासाठी स्टार्टअप काम करते. त्यासाठी विविध प्रकल्पांच्या ठिकाणी असलेली जैवविविधता कशी आहे, याचा अहवाल करण्याचे कामही इकोकनेक्टद्वारे केले जाते.

आवडीतून केला निसर्गाचा अभ्यास

शहा यांना लहानपणापासून निसर्गाची आवड आहे. नोकरी करीत असतानाही त्या सातत्याने फिरत. आपण फिरत आहोत तर निसर्गाचा अभ्यास करू, असे त्यांच्या मनात आले. त्यातून पर्यावरणीय समतोल ढासळत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यात सुधारणा करण्याच्या उद्देशाने शहा यांनी या स्टार्टअपची स्थापना केली.

विविध प्रकारचे बांधकाम करताना लँडस्केपिंग कसे असावे. तसेच कोणती झाले लावावीत याची अनेकांना माहिती नसते. तसेच याबाबींचे महत्त्व समजत नाही. फार्महाऊस तयार करायचे असेल तर जंगली झाडे तोडून तिथे फुले लावा, अशी मागणी नागरिक करतात. पण त्या झाडांची तेथील जीवांबरोबर असणारी परिसंस्था खूप महत्त्वाची असते. त्यासाठी आपल्या आजूबाजूच्या निसर्गाचा अभ्यास केला पाहिजे. निसर्ग हा दुर्लक्षित विषय आहे. मात्र तो महत्त्वाचा आहे.

- मोनाली शहा, संस्थापक, इकोकनेक्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com