Pune : अतिक्रमण करावाईत उपायुक्तांची दबंगगिरी;महापालिकेच्या पथकावरही हल्ला

आरटीओ जवळ अतिक्रमण कारवाई सुरू असताना जमावाने महापालिकेच्या पथकावर हल्ला केल्याची घटना
pune encroachment officer action attack on municipal team social media rto encroachment
pune encroachment officer action attack on municipal team social media rto encroachmentsakal

पुणे : महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त माधव जगताप यांनी दबंगगिरी करत अतिक्रमण कारवाईमध्ये लाथ मारून स्टॉल उलथवून लावण्याचा व्हिडिओ समोर आल्याने त्यावरून संताप व्यक्त केला जात आहे.

pune encroachment officer action attack on municipal team social media rto encroachment
Pune News : पुण्यात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला अन् कर्मचाऱ्याला मारहाण!

मात्र, आरटीओ जवळ अतिक्रमण कारवाई सुरू असताना जमावाने महापालिकेच्या पथकावर हल्ला केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाल्याने अतिक्रमण कारवाईतील राडा सर्वांसमोर आला.

गेल्या काही महिन्यांपासून गोपाळ कृष्ण गोखले रस्त्यावरील (फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता) अतिक्रमणाचा प्रश्‍न गंभीर झाला आहे. यामध्ये भारतीय नागरिक नसलेले लोक व्यवसाय करत आहेत, महिलांच्या सुरक्षेचाही प्रश्‍न निर्माण झाला आहे.

pune encroachment officer action attack on municipal team social media rto encroachment
Pune News : पुण्यात अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्याला अन् कर्मचाऱ्याला मारहाण!

त्याबाबत अनेक संघटनांना प्रशासनाकडे लेखी तक्रार केली आहे. त्याच ठिकाणी उपायुक्त माधव जगताप यांनी कारवाई दरम्यान खाद्य पदार्थाच्या स्टॉलवरील शेगडीला लाथ मारून भांडे खाली पाडल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यावरून जगताप यांच्या कार्यपद्धतीवर टीका केली जात असून, त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

खासदार सुप्रिया सुळे यांनी हा व्हिडिओ ट्विट करत ‘‘जगताप यांचे हे वागणे पाहून सखेद आश्‍चर्य वाटले. अधिकारी संवेदनशील असले पाहिजेत, त्यावर कारवाई करावी’’ अशी मागणी केली आहे.

pune encroachment officer action attack on municipal team social media rto encroachment
PMC Budget 2023: पुण्याच्या अर्थसंकल्पातून पुणेकरांना काय मिळालं? वाहतूक, रस्ते, पाणी समस्येतून दिलासा मिळणार?

महापालिका कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन

जगताप यांच्या व्हिडिओची चर्चा सुरू असतानाच दुपारी दीडच्या सुमारास अतिक्रमण कारवाईच्या पथकावर जमावाने हल्ला केला. जून महिन्यात होणाऱ्या ‘जी २०’ परिषदेच्या तयारीसाठी रस्त्यावरील अतिक्रमणे काढली जात आहेत.

आरटीओ कार्यालयाजवळ कैलास स्मशानभूमीच्या रस्त्यावर कारवाई सुरू असताना तेथील समाजकंटकांना सुरक्षा कर्मचाऱ्यांवर जीवघेणा हल्ला केला. त्याचाही व्हिडिओ व्हायरल झाला. अतिक्रमण पथकावर वारंवार हल्ले होत असल्याने त्याविरोधात बुधवारी काम बंद आंदोलन केले जाणार आहे.

‘‘गोखले रस्त्यावर अतिक्रमण कारवाई सुरू असताना तेथील व्यावसायिकांनी पथकातील कर्मचाऱ्यांवर दादागिरी, धमकावले होते. ५ एप्रिल रोजीचा हा अर्धवट व्हिडिओ व्हायरल त्यामुळे अनधिकृत व्यावसायिकांची अरेरावीचा व्हिडिओ समोर आलेला नाही. महापालिकेच्या पथकावर वारंवार हल्ले होत असून, कर्मचारी गंभीरपणे जखमी झाले होत. पुरेसा पोलिस बंदोबस्त देखील मिळत नाही.’’

- माधव जगताप, उपायुक्त, अतिक्रमण विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com