पुणे : अतिक्रमण करावाई मंदावली ?

पुणे महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर महापालिकेने शहरातील अतिक्रमणांवर
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSakal

पुणे : महापालिकेने गेल्या काही दिवासांपासून सुरू केलेली अतिक्रमण कारवाई काही प्रमाणात थंडावली असून, नदीपात्रात इतर ठिकाणीही हरित पट्ट्यात व निळ्या रेषेच्या आतील बांधकामांवर अद्याप कारवाई झालेली नाही.

पुणे महापालिकेवर प्रशासक आल्यानंतर महापालिकेने शहरातील अतिक्रमणांवर व अनधिकृत बांधकामांवर कारवाई सुरू केली. अनेक भागात मोठ्या कारवाई केल्याने अतिक्रमण करणाऱ्यांनी कारवाईचा धसका घेऊन स्वतःहून अतिक्रमण काढून घेतले. बांधकाम विभागाकडूनही नोटिसा बजावून कारवाई केली. यामध्ये म्हात्रे पूल ते राजाराम पूल या दरम्यान मोठी कारवाई केली. यामुळे बड्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले, पुन्हा कारवाई होऊ नये यासाठी राजकीय दबाव देखील आला आहे.

डीपी रस्त्यावरील कारवाईनंतर शहरात इतर ठिकाणी मोठी कारवाई झालेली नाही. तसेच शहराच्या इतर भागात हरित पट्ट्यात, निळ्या रेषेच्या आत, नाल्यांवर अतिक्रमण असताना त्यावर अद्याप कारवाई झालेली नाही. अतिक्रमण विभागाने कारवाईसाठी मनुष्यबळ व इतर यंत्रणा तयार ठेवली आहे, पण बांधकाम विभागाकडून नोटिसा देण्यास विलंब होत आहे, तसेच कायदेशीर प्रक्रियाही पूर्ण होत नसल्याने कारवाई मंदावली असल्याची चर्चा प्रशासनात आहे.

अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे म्हणाले, ‘‘पुढील काळातही अतिक्रमण व अनधिकृत बांधकामावरील कारवाई सुरूच राहणार आहे, कारवाई थांबलेली नाही. तसेच नदीत हरित पट्ट्यातील अतिक्रमण व बांधकामांवरही कारवाई केली जाईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com