पुण्यात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 3 जानेवारी 2017

पुणे - किर्लोस्कर वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषद आणि सर परशुरामभाऊ महाविद्यालयाने पुण्यात पर्यावरणस्नेही साहित्य संमेलन आयोजिले आहे. याच्या अध्यक्षपदी संत साहित्याचे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांची निवड केली आहे. 

महाविद्यालयाच्या देवी रमाबाई सभागृहात गुरुवारी (ता. 5) सकाळी अकरा ते सायंकाळी पाच या वेळात हे संमेलन होणार आहे. याचे उद्‌घाटन सामाजिक कार्यकर्ते विकास आमटे यांच्या हस्ते होणार आहे. त्यानंतर त्यांची प्रकट मुलाखत डॉ. मंदार परांजपे घेणार आहेत. विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या साहित्याचे सादरीकरण हे संमेलनाचे वैशिष्ट्य आहे. संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात पर्यावरणतज्ज्ञ अनिरुद्ध चावजी यांचे "रामायणातील पक्षीजीवन' या विषयावर व्याख्यान, अशोक नायगावकर आणि रमजान मुल्ला यांच्या कवितांची मैफल होणार आहे. संमेलनाचा समारोप साहित्यिक डॉ. अनिल अवचट यांच्या उपस्थितीत होणार आहे, अशी माहिती परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. या वेळी प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोशाध्यक्ष सुनीताराजे पवार, किर्लोस्कर वसुंधरा महोत्सवाचे संयोजक वीरेंद्र चित्राव, प्राचार्य दिलीप शेठ उपस्थित होते. त्यांच्या हस्ते संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरणही करण्यात आले.

Web Title: Pune environmentally friendly sahitya sammelan