पुणे तिथे काय उणे; पुण्यात असाही 'फॅशन शो' (व्हिडिओ)

सकाळ वृत्तसेवा 
सोमवार, 2 डिसेंबर 2019

महागड्या हॉटेलांमध्ये तेवढेच महागडे कपडे परिधान करून ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. पण पुण्यामध्ये चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाणी बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन, इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट अशा टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या टिकावू कपड्यांच्या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी ‘मिस आणि मिसेस माय अर्थ’हा ‘फॅशन शो’ सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलमध्ये झाला.

पुणे - महागड्या हॉटेलांमध्ये तेवढेच महागडे कपडे परिधान करून ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात येते. पण पुण्यामध्ये चक्क प्लॅस्टिकच्या पिशव्या, पाणी बॉटल्स, सॅनिटरी नॅपकिन, इलेक्‍ट्रॉनिक वेस्ट अशा टाकावू वस्तूंपासून बनविलेल्या टिकावू कपड्यांच्या ‘फॅशन शो’चे आयोजन करण्यात आले. पर्यावरण जागृतीसाठी ‘मिस आणि मिसेस माय अर्थ’हा ‘फॅशन शो’ सिंहगड रस्ता येथील अभिरुची मॉलमध्ये झाला.

माय अर्थ फाउंडेशन आयोजित या अभिनव उपक्रमात सहआयोजक म्हणून वनराई संस्था आणि दीपाली भोसले फाउंडेशन सहभागी झाले होते. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महापालिका यांनी सहकार्य केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे एप

या वेळी नियंत्रण मंडळाचे सचिव राघवेंद्रीयन, मनपाचे घनकचरा व्यवस्थापन सहआयुक्त ज्ञानेश्‍वर मोळक, अनंत घरत, नितीन देशपांडे, रवींद्र धारिया, दीपाली सय्यद आदी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Pune Fashion Show in garbage material