death
deathsakal

पुणे : नैराश्यात असलेल्या पित्याची गळफास घेऊन आत्महत्या

राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडली आहे.

किरकटवाडी : राहत्या घरी पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा येथे घडली आहे. संजीव दिगंबर कदम (वय ४०) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव असून त्यांच्या दोन्ही मुलांचे (एक मुलगा व एक मुलगी) एक वर्षभरापूर्वी आजारपणामुळे निधन झाले होते, तेव्हापासून ते नैराश्यात होते.

हवेली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दोन दिवसांपूर्वी संजीव कदम हे पत्नीला माहेरी सोडून आले होते. दुपारपासून त्यांची पत्नी त्यांना फोन लावत होती, परंतु संजीव कदम फोन उचलत नव्हते. शेवटी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कदम यांच्या पत्नीने ओळखीच्या काहींना फोन करुन घरी जाऊन पाहण्यास सांगितले. घराचा दरवाजा आतून बंद असल्याने दरवाजा तोडला असता कदम हे पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळले. हवेली पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार अजय पाटसकर व पोलिस नाईक किरण बरकाले यांनी घटनास्थळी जाऊन लटकलेला मृतदेह खाली उतरवला. पोलिस निरीक्षक सदाशिव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरू आहे.

मुलांचा विरह असह्य

मिळालेल्या माहितीनुसार वर्षभरापूर्वी संजीव कदम यांचा चौदा वर्षांचा मुलगा व दहा वर्षांची मुलगी या दोघांचेही काही दिवसांच्या अंतराने आजारपणामुळे निधन झाले होते. दोन्ही मुले गेल्यापासून कदम हे निराश राहायचे. मुलांच्या विरहामुळे नैराश्यातून कदम यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com