esakal | बर्थडेसाठी घरी आलेल्या मुलीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील कॅम्पमधील घटना

बोलून बातमी शोधा

Crime_Rape}

पीडित मुलीची आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली.

बर्थडेसाठी घरी आलेल्या मुलीच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार; पुण्यातील कॅम्पमधील घटना
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : मुलीनं तिच्या वाढदिवसानिमित्त मैत्रिणींना घरी बोलावले होते. त्यातीलच मुलीच्या एका १५ वर्षीय मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी आणि दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. विशेष न्यायाधीश के. के. जहागीरदार यांनी हा निकाल दिला.

पूजा चव्हाण प्रकरण : भाजप आणि लीगल जस्टीसचे दोन्ही खटले कोर्टाने फेटाळले​

संजय राधाकिसन वाव्हळ (वय ५७, रा. कॅम्प) असे या गुन्हेगाराचे नाव आहे. याबाबत पीडितेच्या आईने लष्कर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना १० मे २०१८ रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. पीडित ही वाव्हळच्या मुलीची मैत्रीण आहे. आरोपीच्या लहान मुलीचा वाढदिवस असल्याने ती त्याच्या घरी गेली होती. यावेळी, त्याने संबंधित मुलीशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करून तिचा विनयभंग केला. त्यामुळे घाबरलेली मुलगी मैत्रिणीच्या आईजवळ थांबली होती. त्यानंतर ती रडत तिच्या आईकडे गेली. तेव्हा हा प्रकार उघड झाला. त्यानंतर याबाबत पोलिसांत तक्रार दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

पुण्यातील धक्कादायक घटना; आईला मारहाण करत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

या खटल्यात सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अरुंधती ब्रम्हे यांनी काम पाहिले. त्यांनी चार साक्षीदार तपासले. पीडित मुलीची आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असलेल्या तिच्या बहिणीची साक्ष महत्त्वाची ठरली. साथीदारांचे जबाब आणि सरकारी वकीलांनी सादर केलेला पुरावा ग्राह्य धरत न्यायालयाने ही शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक पी. डी. चव्हाण यांनी केला. त्यांना हवालदार बी. डी. थोरात यांनी मदत केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)