Thur, Sept 28, 2023

Pune : संचेती पुलावर आंदोलन करणाऱ्या तरुणाविरुद्ध गुन्हा; 'शोले स्टाईल' केलं होतं आंदोलन
Published on : 31 May 2023, 1:15 pm
पुणे : जुन्नरच्या तहसिलदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संचेती पुलावर ‘शोले स्टाइल’ आंदोलन करणाऱ्या तरुणाविरुद्ध खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
महेंद्र संपत डावखर (वय २७, रा. सुलतानपूर, ता. जुन्नर) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलिस हवालदार सोमनाथ कुंभार यांनी फिर्याद दिली आहे. जमीन मोजणीत साताबाऱ्यावर चुकीच्या पद्धतीने नोंद केल्याचा आरोप करीत महेंद्र डावखर या तरुणाने जुन्नरच्या तहसीलदारावर कारवाई करण्याची मागणी केली होती.
तसेच, मंगळवारी दुपारी संचेती पुलावर चढून उडी मारून आत्महत्या करण्याची धमकी दिली. या घटनेमुळे पोलिस, अग्निशामक दल आणि महसूल प्रशासनाची धावपळ उडाली होती. तसेच, बराच वेळ वाहतूक कोंडी झाली होती. या प्रकरणी खडकी पोलिसांनी मंगळवारी रात्री तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल केला.