पुणे : महिला सक्षमीकरणासाठी सुरु केलेला कारखाना जळून खाक

fire
fire

पुणे  : महिला बचत गटाच्या मसाला कांडप कारखान्याला आग लागल्याची घटना आज (सोमवार) सकाळी बिबवेवाडीतील ओंकारनगर परिसरात घडली. 

कारखान्यात लागलेल्या आगीत सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे शेजारील फर्निचर व प्लायवूडचे दोन कारखाने देखील जळून खाक झाले आहेत. अग्निशमन दलाने तत्काळ आग शमविली असून या घटनेत कोणीही जखमी नाही, अशी माहिती अग्निशामक दलाने दिली आहे. 

आग लागलेला कारखाना लष्करातुन निवृत्त झालेले युवराज कसबे यांनी त्यांच्या पत्नीसमवेत बचत गटातील महिलाच्या सक्षमीकरणासाठी सुरु केला होता. कसबे हे वस्तीमधील व गोरगरीब मुलांना मोफत व्यायामाचे धडे देतात. कारखान्याला लागलेल्या आगीत सर्व काही जळून खाक झाले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com