पुणे : पापडेवस्ती येथील सदनिकेला आग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 6 डिसेंबर 2018

हडपसर : पापडेवस्ती येथे पाजव्या मजल्यावरील सदनिकेला आग लागून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाले. हडपसर अग्निशामक केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी तातडीने गॅस सिलेंडर बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. शॅार्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा प्राथमिक अंदाज आहे. हि घटना गुरवारी दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली.
 
सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा

अग्निशामक कर्मचारी दत्ता चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, संजुदा कॅाम्पक्लेसमधील पाचव्या मजल्यावरील बेडरूमध्ये आग लागली. येथे अग्निशामक दलाची गाडी जाण्यासाठी रस्ता अरूंद आहे. रूपाली विनायक नायडू यांच्या मालकाची ही सदनिका असून तेथे शोभा नससींग गुहीजोत या भाडयाने राहतात. घर बंद असताना अचनाक आग लागली. याठिकाणीच मुलांची शिकवणी घेतली जाते. या घटनेत संसार उपयोगी वस्तूंचे मोठे नुकसान झाले. मात्र गॅस सिलेंडर तातडीने बाहेर काढल्याने मोठी दुर्घटना टळली. कैलास टकले, संजय जाधव, सोमनाथ मोरे, मारूती शेलार आणि दत्ता चौधरी यांनी आग विझविण्य़ासाठी प्रयत्न केले. 

Web Title: Pune: Fire in flat at Papadevasti