अबब! दोन लाखांचा शाईपेन

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

ब्रिटिशकालीन पेनाचाही समावेश
या प्रदर्शनात जर्मन, रशिया, अमेरिका, जपान, टर्की, ऑस्ट्रेलियासह १३ देशांतील ३० हून अधिक नामवंत ब्रॅंडच्या कंपन्यांचे पेन नागरिकांना पाहता येणार आहेत. याशिवाय इंग्रजांच्या काळातील व्हिंटेज पेनदेखील या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे.

पुणे - शंभर रुपयांपासून दोन लाखांपर्यंत किमतीचे, भारतासह तेरा देशांतील आणि तीसहून अधिक नामवंत कंपन्यांचे शाईचे पेन (फाउंटन पेन) पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. केअर स्टेशनर्स अँड एजन्सीजच्या वतीने देशात प्रथमच अशा प्रकारचे प्रदर्शन पुण्यात भरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाईच्या पेनाने लिखाणाची आवड निर्माण व्हावी, हा त्यामागे उद्देश आहे.

‘द पुणे फाउंटन पेन शो-२०१९’ या नावाने हे प्रदर्शन २९ सप्टेंबर ते १ ऑक्‍टोबर या कालावधीत आपटे रस्त्यावरील स्वप्नशिल्प-श्रेयस बॅंक्वेट्‌समध्ये होणार आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन पोलिस आयुक्त के. वेंकटेशम आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कंपनीच्या रश्‍मी नगरकर-पिल्ले यांनी दिली. सकाळी ११ ते संध्याकाळी ८ या वेळेत प्रदर्शन खुले राहील.

सुंदर अक्षरासाठी शाईपेन मोलाचा आहे. शाईपेनाचे महत्त्व रुजावे, त्याचा जास्तीत जास्त वापर व्हावा, हा या प्रदर्शनामागील हेतू आहे, असे पिल्ले यांनी सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the pune fountation pen show 2019

टॅग्स