पुणे : गॅसगळतीमुळे झालेल्या स्फोटात चौघे भाजले

pune.jpg
pune.jpg

पुणे : घरामध्ये गॅस गळती होऊन झालेल्या स्फोटात वडा-पाव, समोसे बनविणारे चौघे कामगार भाजुन जखमी झाले. ही घटना सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजता कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजवळील एका घरात घडली. दरम्यान अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन आग शमवली.

कर्वेनगर येथील कमिन्स कॉलेजजवळच्या वसंत मित्र मंडळाजवळ एका घरात वडापाव, समोसे बनवुन विक्री करणारे तरुण राहतात. सोमवारी सकाळी चौघापैकी एकजणाने झोपेतुन उठून गॅस पेटविन्याचा प्रयत्न केला, मात्र गॅस पेटला नाही. दरम्यान तो तरुण स्वच्छतागृहात् गेला. त्यानंतर त्याने पुन्हा दूसरा गॅस पेटविन्याचा प्रयत्न केला. त्यावेळी घरामध्ये पसरलेल्या गॅसने पेट घेतला. त्यावेळी गॅस पेटविणारा तरुण भाजुन बाहेर फेकला गेला. तर तेथे झोपलेले अन्य तिघेजण ही भाजले.

याघटनेबाबत कोथरुड अग्निशामक दलाला खबर मिळाली. दलाच्या जवानानी काही वेळातच आग शमवली. दरम्यान जखमी झालेल्या कामगारांना तत्काळ उपचारासाठी ससून रुग्णलयात हलविण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com