निगडी प्राधिकरणातील अधिकारी असल्याचे भासवले; टुरीस्ट व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा

फिर्यादीची खात्री पटविण्यासाठी त्याने राज्य सरकारचे बनावट ओळखपत्रही फिर्यादीस दाखविले.
निगडी प्राधिकरणातील अधिकारी असल्याचे भासवले; टुरीस्ट व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा

पुणे : निगडी प्राधिकरणातील अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीने टुरीस्ट व्यावसायिकाकडील वाहने भाड्याने घेऊन दिड वर्षांचे भाडे थकवून तब्बल 11 लाख 60 हजार रुपयांची फसवणूक केली. याप्रकरणी चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी नवाज देशमुख (वय 30, रा.खराडी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरुन अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे टुरीस्ट व्यावसायिक आहेत. नागरीकांसह विविध सरकारी व खासगी कार्यालयांना वाहने भाड्याने देतात. दरम्यान, त्यांना एका व्यक्तीने संपर्क साधला. तो निगडी प्राधिकरणामध्ये उपविभागीय अधिकारी असल्याचे सांगितले.

निगडी प्राधिकरणातील अधिकारी असल्याचे भासवले; टुरीस्ट व्यावसायिकाला घातला लाखोंचा गंडा
गरीबांना शिवभोजनाचा आसरा; जाणून घ्या पुण्यात कुठे कुठे मिळतेय ही थाळी?

तसेच फिर्यादीची खात्री पटविण्यासाठी त्याने राज्य सरकारचे बनावट ओळखपत्रही फिर्यादीस दाखविले. त्यानंतर त्याने दैनंदिन वापरासाठी फिर्यादीकडून इनोव्हा व फॉर्च्युनर अशा दोन गाड्या भाड्याने घेतल्या. या गाड्यांचे भाडे त्याने सुरूवातीला काही प्रमाणात दिले. त्यानंतर त्याने गाड्यांचे भाडे थकविण्यास सुरूवात केली. दिड वर्षाचे तब्बल 11 लाख 60 हजार रुपये इतके भाडे त्याने थकविले. त्यामुळे फिर्यादीने त्याच्याकडे भाड्याचे पैसे मागण्यास सुरूवात केली. तेव्हा त्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. आरोपीने फिर्यादीच्या तीन साथीदारांनाही जुन्या गाड्या स्वस्तात मिळवून देतो असे सांगून त्यांच्याकडूनही आगाऊ रक्कम घेतली होती. तर काही जणांना रेल्वेमध्ये नोकरीला लावून देतो असे सांगून त्यांची फसवणूक केल्याची माहिती फिर्यादीस मिळाली. त्यानंतर फिर्यादीलाही गाड्यांचे पैसे मिळत नसल्यामुळे व संबंधित व्यक्तीकडून फसवणूक केली जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी चंदननगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com