जागतिक संस्थांना पुणे अनुकूल - डॉ. रघुनाथ माशेलकर

Raghunath-Mashelkar
Raghunath-Mashelkar

पुणे - ‘प्रतिभा, तंत्रज्ञान आणि सहिष्णुता हे तीन गुण पुण्यातील नागरिकांमध्ये आहेत. त्यामुळे इतर शहरांपेक्षा पुण्याची वेगळी ओळख आहे. याच गुणांमुळे जागतिक संस्थांना येथे काम करणे अनुकूल वाटते. ते पुण्यात येण्यासाठी सदैव तयार असतात,’’ असे मत ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.

पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल), तसेच नीती आयोग, स्मार्ट सिटी मिशन, पुणे महापालिका यांसह इतर संस्थांच्या मदतीने ‘लिव्हिंग लॅब (जिवंत प्रयोगशाळा)- डिजिटल शहर’ या विषयावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते. पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, मनोजित बोस उपस्थित होते. 

राजेंद्र जगताप म्हणाले, ‘‘स्मार्ट सिटी अंतर्गत प्रकल्प राबवताना कमांड अँड कंट्रोल सेंटरशी संपूर्ण माहितीचे एकात्मीकरण महत्त्वाचे ठरते. त्यामुळे वेगवेगळ्या दिशांमध्ये काम करणाऱ्या शासकीय संस्थांचा समन्वय साधला जातो. म्हणून इंटिग्रेटेड कमांड अँड कंट्रोल सेंटर हा स्मार्ट प्रकल्पांसाठी महत्त्वाचा दुवा आहे.’’ प्रशासन आणि नगरपालिका सेवांमध्ये परिवर्तनासाठी माहिती आणि तंत्रज्ञानाच्या नावीन्यपूर्ण वापरासाठी पुणे कायमच आघाडीवर आहे. पुण्यातील विकासाच्या संधींचा विचार करण्यासाठी ‘लिव्हिंग लॅब’ कार्यशाळेच्या निमित्ताने एकत्र आणण्याचा यशस्वी प्रयत्न करण्यात आला.  या वेळी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील तज्ज्ञांनी सहभाग नोंदवून स्मार्ट, निरोगी, प्रवेशयोग्य शहराबाबत विचार मांडले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com