esakal | पुण्यात ऐन दसरा-दिवाळीत घरगुती गॅस दरवाढीचा भडका
sakal

बोलून बातमी शोधा

cylinder

पुण्यात ऐन दसरा-दिवाळीत घरगुती गॅस दरवाढीचा भडका

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणेकरांना, घरगुती गॅस सिलिंडर दरवाढीचा पुन्हा एकदा झटका बसला आहे. गेल्या तीन महिन्यात सतत होणाऱ्या दरवाढीने सुमारे १०० रुपयांनी महागला आहे. गेल्या वर्षभराची तुलना करावयाची झाल्यास, सिलिंडरच्या दरात तब्बल २९१ रुपयांची वाढ झाली आहे. यानुसार गॅस दरात दरमहा सरासरी प्रति सिलिंडर २४ रुपये २५ पैशांची वाढ झाली आहे. यामुळे शहरातील सर्वसामान्य कुटुंबांचे महिन्याचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. यामुळे प्रत्येक कुटुंबावर आता वर्षाला सुमारे पाच हजार रुपयांचा भुर्दंड सोसावा लागणार आहे.

हेही वाचा: भारताच्या दबावापुढे ब्रिटन झुकला; प्रवाशांसाठी क्वारंटाइनचा नियम रद्द

घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात काल (बुधवारी) पुन्हा प्रति सिलिंडर २५ रुपयांची वाढ झाली आहे. यामुळे पुणे शहरातील गॅस सिलिंडरसाठी आता प्रति सिलिंडर ८८८ रुपये मोजावे लागत आहेत. आॅगस्ट महिन्यात हीच किंमत ८६२ रुपये इतकी होती. गेल्या चार महिन्यातील ही चौथी दरवाढ आहे.

किमान चार व्यक्तींचे कुटुंब असलेल्यांना दरमहा किमान एक तर, चारहून अधिक व्यक्ती असलेल्या कुटुंबांना दरमहा दोन गॅस सिलिंडर आवश्‍यक आहेत. त्यामुळे किमान चार सदस्यांचे कुटुंबाला आता दरमहा तीनशे रुपये तर त्याहून मोठ्या कुटुंबांना दरमहा सहाशे रुपयांचा आर्थिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. सप्टेंबर २०२० मध्ये एका गॅस सिलिंडरची किंमत ५९७ रुपये होती. ती आता ८८८ रुपये झाली आहे.म्हणजेच गेल्या वर्षभरात २९१ रुपयांनी सिलिंडर महागला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

हेही वाचा: शेजारील देशांना लस पुरवठ्यासाठी सीरम, भारत बायोटेकला परवानगी

वर्षभरातील महिनानिहाय किंमत (प्रति सिलिंडर)

 • सप्टेंबर २०२० -५९७ रुपये

 • आक्टोबर २०२० -५९७

 • नोव्हेंबर २०२० -५९७

 • डिसेंबर २०२० - ६९७

 • जानेवारी २०२१ -६९७

 • फेब्रुवारी २०२१ -७७२

 • मार्च २०२१ - ८२२

 • एप्रिल २०२१ - ८१२

 • मे २०२१ -८१२

 • जून २०२१ -८१२

 • जुलै २०२१ -८३७.५०

 • ऑगस्ट २०२१ -८६२.५०

 • सप्टेंबर २०२१ -८८७.५०

पुण्यातील गॅस सिलिंडरधारक स्थिती

 • एकूण गॅस सिलिंडरधारक - ११ लाख ९९ हजार २३८

 • एकूणमध्ये दोन सिलिंडरधारक - ६ लाख २१ हजार २८७

 • एक सिलिंडरधारक - ५ लाख ७७ हजार ९५१

शहरातील सर्वसामान्य कुटुंबे कोरोनामुळे आधीच आर्थिकदृष्ट्या दुर्बल झाले आहेत. त्यातच आता कोरोनाच्या लाटांप्रमाणे महागाईच्या लाटा येऊ लागल्या आहेत. ऐन सणासुदीच्या काळात झालेली गॅस दरवाढ ही गरिबांना हतबल करणारी आहे. गॅसचे दर सर्वसामान्यांच्या आवाक्यात असणे आवश्‍यक आहे.

- दत्ता जाधव, सामाजिक कार्यकर्ते, पुणे

loading image
go to top