Pune : राजभवन, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारातून चंदनाच्या झाडांची चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद

विशेषतः खडकी येथील दारूगोळा कारखाना परिसर, एएफएमसी, एनसीएल अशा संस्थाच्या आवारातून ही चंदन चोरीचे प्रकार घडत होते. चतु:शृंगी पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असलेल्या राजभवन येथेही चोरट्यांनी चंदनाच्या झाडांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला.
Crime
Crimesakal

पुणे - ओैंध परिसरातील राजभवन तसेच राष्ट्रीय रायायनिक प्रयोगशाळेच्या (एनसीएल) आवारातून चंदनाची झाडे कापून नेणाऱ्या चोरट्यांच्या टोळीला अखेर चतु:शृंगी पोलिसांनी जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ किलो चंदनाची लाकडे जप्त करण्यात आली आहेत.

संबंधित टोळीने शहरातील अनेक सरकारी, निमसरकारी संस्था व खासगी मालमत्तेमध्ये चंदनाच्या झाडांची चोरी केल्याची माहिती पुढे आली आहे. त्यांच्याविरुद्ध शहरात सात ठिकाणी चंदन चोरी केल्याचे गुन्हे दाखल आहेत.

कैलास साहेबराव अगिवले (वय २१, रा. बाभुळवडे, जि. नगर), सुुनिल सुरेश अगिवले (वय २०, रा. संगमनेर, नगर) अशी अटक केलेल्या चोरट्यांची नावे आहेत. शहराच्या वेगवेगळ्या भागात मागील काही वर्षापासून लष्करी संस्था, सरकारी, निमसरकारी संस्था यांच्यासह विविध ठिकाणी असलेली चंदनाची झाडे चोरीला जाण्याच्या घ्टणा सातत्याने सुरू होत्या.

Crime
Mumbai : मुंबईत आज ५ हजार ठिकाणी 'मन की बात' चे आयोजन

विशेषतः खडकी येथील दारूगोळा कारखाना परिसर, एएफएमसी, एनसीएल अशा संस्थाच्या आवारातून ही चंदन चोरीचे प्रकार घडत होते. चतु:शृंगी पोलिस ठाणे हाकेच्या अंतरावर असलेल्या राजभवन येथेही चोरट्यांनी चंदनाच्या झाडांची चोरी केल्याचा प्रकार उघडकीस आला. सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाच्या असणाऱ्या राजभवन सारख्या ठिकाणीही चोरटे चोरी करू लागल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित करण्यात येऊ लागले होते. या प्रकारची गांभीर्याने दखल घेत अखेर

चतु:श्रुंगी पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. पोलीस कर्मचारी सुरेश काशीद आणि अशोक ननवरे रात्रपाळीत गस्त घालत होते.त्यावेळी त्यांनी राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेच्या आवारात दोघेजण चंदनाचे झाड चोरी करण्यासाठी आले असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार त्यांनी संशयित आरोपींना पाहिले.

तेव्हा चोरट्यानी तेथून पळून जाण्यास सुरुवात केली. त्यावेळी पोलिस कर्मचारी काशीद व ननवरे यांनी त्यांचा पाठलाग करुन दोघांना पकडले. पोलिसांनी त्यांच्याकडून २५ किलो चंदनाची झाडे जप्त केली.

पोलिस उपायुक्त शशिकांत बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पाेलीस निरीक्षक बालाजी पांढरे, पोलिस उपनिरीक्षक निलेशकुमार महाडिक, कपील भालेराव, शेरू वाघवले, इरफान मोमीन, आशिष निमसे, बाबुलाल तांदळे, मारुती केंद्रे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com