पुणे शहरातील कचरा उचलण्यास झाली सुरवात

ज्ञानेश सावंत
सोमवार, 8 मे 2017

पुणे: फुरसुंगी आणि उरळी देवाची ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याने शहरातील कचरा उचलण्यास आजपासून (सोमवार) सुरवात झाली. डेपोत कचरा टाकण्यात येत असला तरी, जुने आणि नव्या प्रकल्पांच्या माध्यमातून कचऱ्यावर प्रक्रियावरील कायम राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे साधारणत एक हजार टन कचऱ्यावर प्रक्रिया होईल तर; सहाशे टन कचरा डेपो टाकण्यात येत असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले.

शहरात गेल्या काही दिवसांपासून जमा झालेला कचऱ्या उचलण्याकरिता, सर्वच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत जादा कामगार नेमले आहेत. तसेच, कचरा वाहून नेण्यासाठी पुरेशा गाड्या उपलब्ध असून, त्यामुळे मंगळवारी (ता. 9) दुपारपर्यंत सर्व कचरा उचलला जाईल, असेही सांगण्यात आले.

डेपोला आग लागल्यानंतर ग्रामस्थांनी कचरा टाकण्यास विरोध करीत सलग 23 दिवस आंदोलन केले होते. त्यामुळे रोज जमा होणारा कचरा पूर्णपणे उचलला जात नव्हता. त्यामुळे अनेक भागात त्याचे ढीग होते. या पार्श्‍वभूमीव मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत झालेल्या बैठकीत तोडगा निघल्यानंतर ग्रामस्थांनी आंदोलन मागे घेतल्याची घोषणा केली. त्यामुळे डेपोत कचरा टाकण्याचा मार्ग मोकळा झाला असून, त्याकरिता सोमवारपासून कचरा उचलण्यात येत आहे. ज्या भागात सर्वाधिक कचरा आहे. आणि त्याबाबत तक्रारी आहेत, तेथील कचरा उचलण्यात येत असल्याचे महापालिकेच्या घनकचरा व व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: pune garbage issue solved