स्मार्ट पुण्यास केंद्राचा ‘स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट’ पुरस्कार

स्मार्ट पुण्यास केंद्राचा ‘स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट’ पुरस्कार

पुणे : सलग अकरा दिवस विविध कलांच्या क्षेत्रांतील तज्ज्ञ, मान्यवरांना पाचारण करीत होतकरू कलाकरांसाठी खुले व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या पुणे स्मार्ट आर्ट वीकचे देशभरातून कौतुक होत आहे. देशातील सर्व स्मार्ट सिटींच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची परिषद राजधानी दिल्लीमध्ये नुकतीच पार पडली.
 
या परिषदेमध्ये केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने पुणे शहराला ‘बेस्ट डिजिटल पेमेंटस ऍडॉप्टर' श्रेणीमधील `स्मार्ट सिटीज डिजिटल पेमेंट २०१८' पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. पुण्याच्या महापौर सौ. मुक्ता टिळक, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, अतिरिक्त आयुक्त रुबल अगरवाल आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख राहुल जगताप यांनी हा पुरस्कार स्वीकारला. नवी दिल्लीतील एनडीएमसी कन्वेन्शन सेंटरमध्ये केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्री हरदीपसिंग पुरी यांच्या हस्ते हा पुरस्कार देण्यात आला. यावेळी सचिव दुर्गाशंकर मिश्रा, स्मार्ट सिटी मिशन संचालक कुणाल कुमाल, एनडीएमसीचे अध्यक्ष नरेश कुमार उपस्थित होते. 
 
स्मार्ट आर्ट वीक आयोजित करणारी पुणे ही देशातील पहिली स्मार्ट सिटी ठरली आहे. याबद्दल परिषदेत बोलताना पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “आम्ही कला, संस्कृतीबरोबच विकास प्रक्रियेत नागरिकांच्या सर्वमावेशक सहभागास प्रोत्साहन देण्यासाठी देशातील पहिला 11 दिवसांचा स्मार्ट आर्ट वीक आम्ही आयोजित केला. उत्सव साजरा केला. बेरोजगार लोकांना एकत्र आणणे आणि त्यांना प्रशिक्षित करणे आणि कौशल्यांचा संपूर्ण सेतू बनविण्याची ही एक मोहीम होती.” 
देशभरातील स्मार्ट सिटीजमध्ये डिजिटल पेमेंट्सला प्रोत्साहन देण्याच्या हेतूने वेगवेगळ्या श्रेणींमध्ये डिजिटल पेमेंटस पुरस्कारांचे आयोजन केंद्र सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी कार्ये मंत्रालयाच्या वतीने करण्यात आले होते. त्यासाठी जुलै २०१८ पासून महानगरपालिकेतील विविध प्रकारच्या डिजिटल व्यवहारांचा अभ्यास करण्यात आला. 

मिळकत कर, विविध प्रकारचे परवाने, ना हरकत प्रमाणपत्रे तसेच इतर सेवांसाठीचे शुल्क डिजीटली अदा करण्यासाठीच्या डिजिटल व्यवस्था त्याचा नागरिकांनी केलेला वापर तसेच महानगरपालिकेकडून कंत्राटदार आणि इतर वैयक्तिक लाभार्थ्यांना द्यावयाच्या देयकांचे डिजीटलायझेशन आणि त्यांचा वापर आदी बाबींचा अभ्यास करण्यात आला. डिजिटल पेमेंट्सची प्रणाली राबविण्यासाठी आणि प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापाल श्रीमती. उल्का कळसकर आणि माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख श्री. राहुल जगताप यांनी माननीय आयुक्त श्री. सौरभ राव यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष प्रयत्न केले. 

डिजिटल पेमेंट पुरस्काराबद्दल पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप म्हणाले, “डिजिटल पेमेंटच्या नव्या तंत्रज्ञानाला त्वरीत आत्मसात करून त्यामध्ये हिरिरीने सहभाग घेणाऱ्या स्मार्ट पुणेकरांना या पुरस्काराचे श्रेय जाते. सर्व प्रकारच्या नागरी सेवांचे शुल्क ऑनलाईन भरता यावे या दृष्टीने माहिती तंत्रज्ञान, तसेच विविध विभागांकडून प्रयत्न करण्यात येत आहेत. या पुरस्कारामुळे डिजिटल पेमेंटच्या या परिवर्तनाला प्रोत्साहन व चालना मिळेल.”

या पुरस्काराच्या पहिल्या टप्प्यासाठी देशभरातील ७२ स्मार्ट शहरे पात्र ठरली. त्यानंतर दुसऱ्या टप्प्यासाठी एकूण ६५ शहरांनी सादरीकरण केले.  त्यामध्ये १० लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलल्या शहरांमध्ये `बेस्ट डिजिटल पेमेंटस ऍडॉप्टर' श्रेणीत पुणे शहराला पुरस्कार प्राप्त झाला. केंद्र सरकारच्या वतीने नुकतेच हे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com