पुण्याची रितीशा गुप्ता आयएससी परीक्षेत देशात दुसरी

वृत्तसंस्था
मंगळवार, 15 मे 2018

"देशात दुसरा क्रमांक मिळवल्याचा आनंद वाटत आहे. मला नेहमीच कला आणि इतिहासात आवड आहे. मी याच विषयातच करिअर करणार आहे." असे सांगुन रितीशाने भावना व्यक्त केल्या.

पुणे : पुण्याच्या रितीशा गुप्ता हिने आयएससी परीक्षेत 99.25 टक्के मिळवुन देशात दुसरा क्रमांक पटकावला. आयसीएसई आणि आयएससी परीक्षांचे निकाल सोमवारी जाहिर करण्यात आले. निकाल जाहिर झाल्यानंतर पुणे आणि मुंबईतील विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसत आहे. 

आयएससी परीक्षेत देशातील प्रथम क्रमांकावर 7, दुसऱया क्रमांकावर 17, तर तिसऱया क्रमांकावर 25 विद्यार्थ्यांनी बाजी मारली. रितीशा आयएससी परीक्षेत देशात दुसरा क्रमांक पटकावणाऱय़ा 17 विद्यार्थ्यांपैकी एक आहे. रितीशा पुणे कॅम्प येथील बिशप्स स्कुलमध्ये शिकते. तिला इतिहास विषयाची व पियानो वादनाची आवड आहे. ती दिल्ली विद्यापिठातून राज्यशास्त्र विषयात पुढील शिक्षण घेण्याची  तयारी करत आहे.  

"देशात दुसरा क्रमांक मिळवल्याचा आनंद वाटत आहे. मला नेहमीच कला आणि इतिहासात आवड आहे. मी याच विषयातच करिअर करणार आहे." असे सांगुन रितीशाने भावना व्यक्त केल्या.

नवी मुंबईच्या सयंम दास याने आयसीएसई परीक्षेत 99.4 टक्के मिळवून देशात पहिला क्रमांक पटकावला आहे. 

 

Web Title: pune girl ritisha gupta second in country in ISC