पुण्यात शिवाजी पुलावरून नदीपात्रात पडली तरुणी

shivaji-pul.jpg
shivaji-pul.jpg

पुणे : शिवाजी पुलावरुन एक तरुणी नदीपात्रात पडली. ही घटना सोमवारी (ता.11) पहाटे दोन वाजता घडली. त्यामध्ये तरुणीला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर ससुन रुग्णलयात उपचार सुरु आहेत. 

शिवाजी पुलावरुन एक तरुणी नदीपात्रात पडल्याची खबर शिवाजीनगर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस तत्काळ घटनास्थली दाखल झाले. जीवरक्षक राजेश काची व त्यांच्या साथीदारानी तरुणीस बाहेर काढले. मात्र ऊंचावरुन खाली पडल्याने तरुणीचा हात मोडला असून डोक्याला जबर मार लागला आहे.

तरुणी घाबरलेली असल्याने तिने नाव सांगितले नाही. तसेच ती कशी पडली की आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला, याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही. तिच्यावर ससुन रुग्णलयात उपचार सुरु आहेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com